Virat Kohli : ‘गोष्ट खऱ्या खोट्याची नाहीय’, विराटवरुन Live शो मध्ये दोन भारतीय क्रिकेटपटू आपसात भिडले, VIDEO
Virat Kohli : यशस्वी जैस्वाल आऊट झाला, त्यावेळी विराट कोहली त्याच्यासोबत बॅटिंग करत होता. दोघांमध्ये समन्वय नसल्यामुळे यशस्वी रनआऊट झाला. आता या मुद्यावरुन भारताचे दोन माजी क्रिकेटपटू आपसात भिडले.
टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली सध्या चर्चेत आहे. आधी ऑस्ट्रेलियाकडून डेब्यु करणाऱ्या सॅम कॉन्स्टसला खांद्या मारल्यामुळे विराट चौफेर टीकेचा सामना करतोय. आता विराटची चर्चा ओपनर यशस्वी जैस्वालला रनआऊट केल्यामुनळे होतेय. यशस्वी जैस्वाल आऊट झाला, त्यावेळी विराट कोहली त्याच्यासोबत बॅटिंग करत होता. दोघांमध्ये समन्वय नसल्यामुळे यशस्वी रनआऊट झाला. आता या मुद्यावरुन भारताचे दोन माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि संजय मांजरेकरमध्ये लाईव्ह शो मध्ये जोरदार वादविवाद झाला.
संजय मांजरेकरने यशस्वी जैस्वालच्या आऊट होण्यासाठी विराट कोहलीला जबाबदार धरलं. याला शालेय क्रिकेटमधील चूक ठरवलं. मांजरेकर म्हणाला की, “आपण जरा जास्त विराट कोहलीबद्दल विचार करतोय. ही शालेय चूक होती. विराटने मागे बघितलं आणि ठरवलं की हा रन्स नाहीय. वास्तवात हा कॉल नॉन स्ट्रायकरचा नसतो, स्ट्रायकरचा असतो. जैस्वालचा बॅड कॉल असता, तर पॅट कमिन्सने बॉलिंग एन्डला थ्रो केला असता”
‘मी जे बोलतोय, ते तुम्हाला समजत नाहीय’
त्यानंतर इरफान पठाण म्हणाला की, “क्रिकेटच सत्य हे सुद्धा आहे की, कोणी कट मारला. पॉइंटला फिल्डरच्या हातात बॉल गेला. तो कॉल नॉन स्ट्रायकरचा असतो. पण जो फलंदाज स्ट्राइकवर आहे, तो सुद्धा मना करु शकतो” इरफानला मध्येच टोकत संजय मांजरेकर म्हणाला की, ‘ही पॉइंटची गोष्ट आहे. आपण मागची गोष्ट बोलतोय’ त्यानंतर इरफान म्हणाला की, “गोष्ट खरं आणि खोट्याची नाहीय. मी जे बोलतोय, ते तुम्हाला समजत नाहीय. विराट कोहली आहे म्हणून नाही, ही ओपिनियनची गोष्ट आहे”
Kalesh between Irfan and Sanjay Manjrekar 😭 pic.twitter.com/9Ucs6FU3pb
— Pallavi Anand (@PallaviSAnand) December 27, 2024
‘तुम्ही बोला, इरफान थोडा हसला’
इरफान पुढे म्हणाला की, विराट कोहलीबद्दल काल बोलणं झालं. त्यावेळी आपण सर्व इथे उभे राहून काय बोलत होतो, इरफानच्या या बोलण्यावर संजय मांजरेकरने वेगळीच Reaction दिली. त्यावर मांजरेकर इरफानला म्हणाला की, ‘तू मला बोलू देत नसशील तर ठीक आहे. पण पॉइंट चांगलं उदहारण नाही’ त्यावर इरफान काही बोलू लागला. त्यावर मांजेकरला राग आला. तो इरफानला म्हणाला की, ‘तुम्ही बोला, इरफान थोडा हसला’, संजय बोलला की, बोला, बोला. इरफानच्या मताशी मांजरेकर पूर्णपणे असहमत दिसले.