IND vs AUS ODI : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघात हे 11 खेळाडू असणार, या प्लेयरला मिळणार संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाही. त्यामुळे कर्णधारपद हार्दिक पांड्या याच्याकडे असणार आहे. त्यामुळे प्लेईंग इलेव्हन कशी असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर आता भारतीय संघ वनडेसाठी सज्ज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका 17 मार्चपासून खेळली जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसल्याने कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात प्लेईंग इलेव्हन कशी असेल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. साहाजिकच जखमी खेळाडूंना आराम दिला जाईल. त्यामुळे काही खेळाडूंना संधी मिळणार आहे. या संघात कोण कोण खेळाडू असतील त्यावर एक नजर टाकुयात.
श्रेयस पाठदुखीच्या कारणास्तव संपूर्ण मालिकेत खेळणार नाही. वैयक्तिक कारणामुळे कर्णधार रोहित शर्मा पहिली वनडे खेळणार नाही. त्यामुळे पहिल्या वनडेत ईशान किशनसह शुभमन गिल ओपनिंगला उतरणार आहे. या दोघांचा आक्रमक खेळ पाहता पॉवर प्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारणं शक्य होणार आहे. ईशान किशन आणि शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी केली आहे. ईशान किशनकडे विकेटकिंपिंगचा पर्याय आहे.
?️?️ 'Their intensity in practice rubs onto the youngsters' ?
Ahead of the #INDvAUS ODI series opener, Fielding Coach T. Dilip explains how @imVkohli & @imjadeja have been role models in the field for the youngsters ??#TeamIndia | @mastercardindia pic.twitter.com/4NourJOfR7
— BCCI (@BCCI) March 15, 2023
मिडल ऑर्डरमध्ये तीन नंबरवर विराट कोहली असेल. विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात असून टेस्ट, वनडे आणि टी 20 फॉर्मेटमध्ये शतक ठोकलं आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला संधी मिळेल. पाचव्या क्रमांकावर विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुलचा विचार केला जाऊ शकतो.
कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. त्यामुळे सातव्या क्रमांकासाठी रविंद्र जडेजाला संधी मिळेल. आठव्या स्थानावर अष्टपैलू अक्षर पटेल उतरू शकतो. रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या जोडीमुळे फिरकी अटॅकही मजबूत असेल.
पहिल्या वनडेसाठी वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरला संधी मिळेल. शार्दुल ठाकुर गोलंदाजीसह फलंदाजीतही कमाल दाखवू शकतो. त्यामुळे फलंदाजांसोबत अष्टपैलू खेळाडूंची फौज पहिल्या सामन्यात मैदानात दिसेल.
पहिल्या वनडेसाठी प्लेईंग 11 : ईशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
भारतीय स्कॉड – रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, ईशांत किशन, रविंद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव
भारत विरुद्द ऑस्ट्रेलिया वनडे मालिका
- पहिला सामना, 17 मार्च, दुपारी 1.30 वाजता, मुंबई
- दुसरा सामना, 19 मार्च, दुपारी 1.30 वाजता, विशाखापट्टणम
- तिसरा सामना, 22 मार्च, दुपारी 1.30 वाजता, चेन्नई