IND vs AUS : मानलं, हातावर रक्ताच्या गुठळ्या होऊनही ऋषभ पंतचा एकदम कडक SIX, VIDEO
IND vs AUS : वेदना सहन करुन जो लढतो, तो खरा योद्धा. ऋषभ पंतने आपल्या फलंदाजीतून तेच उदहारण सादर केलय. सिडनी कसोटीत शरीरावर अनेकदा चेंडू लागूनही ऋषभने हार मानली नाही. तो लढत राहीला व एक खणखणीत सिक्स मारला. त्याचा हा सिक्स पाहून सगळेच हैराण झाले.
सिडनी कसोटीत भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 185 धावांवर टीम इंडियाचा डाव आटोपला. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या. ही फार मोठी धावसंख्या नाहीय. पण ऋषभने मैदानात लढण्याची जी वृत्ती दाखवली, ती कौतुकास्पद आहे. दुसऱ्या सेशनमध्ये बॅटिंग करताना ऋषभ पंतला अनेकदा दुखापत झाली. शरीराला चेंडू लागला. दुखापत अशी की, मैदानावर फिजियोला यावं लागलं. पण पंतने या संकटकाळात सहजासहजी हार मानली नाही. दुखापत होऊनही मैदानावर टिकून राहण्याचा त्याने निर्णय घेतला. पंतने धाडस दाखवत फलंदाजी सुरु ठेवली. सिडनी कसोटीत ऋषभ पंतला मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर दुखापत झाली.
सिडनी कसोटीत ऋषभला काही चेंडू हातावर तर काही चेंडू हेल्मेटला लागले. दुखापत इतकी होती की, हातावर रक्ताच्या गुठळ्या झालेल्या. पण त्याने त्याची हिम्मत सोडली नाही. इनिंगच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाची पंत विरोधात ही रणनिती असू शकते. त्याचा काही फायदा झाला नाही. कारण त्याने विकेटवर टिकून राहण्याची पंतची हिम्मत वाढली. त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर सुद्धा दिसून आला.
चेंडू काढण्यासाठी शिडीचा वापर
दुखापत होऊनही ऋषब पंतने सिडनी टेस्टमध्ये भारताकडून पहिला सिक्स मारला. 2025 मधील भारताचा इंटरनॅशनल क्रिकेटमधील हा पहिला सिक्स आहे. पंतने हा सिक्स ऑस्ट्रेलियासाठी डेब्यु करणाऱ्या ब्यू वेब्स्टरच्या चेंडूवर मारला. हा सिक्स इतका लांबलचक मारला की, चेंडू काढण्यासाठी शिडी वापरावी लागली.
RISHABH PANT SMASHED THE FIRST SIX OF 2025 FOR INDIA. 🥶🇮🇳pic.twitter.com/ZyWrt116el
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 3, 2025
भारतीय इनिंगमधील पहिला सिक्स
ऋषभ पंतने सिडनी टेस्टमध्ये भारतीय इनिंगमधील पहिला सिक्स मारला. 5 व्या विकेटसाठी जाडेजासोबत 50 धावांची भागिदारी केली. पण तो मोठी खेळी करु शकला नाही. पंतने 98 चेंडूंचा सामना करत 40 धावा केल्या. यात एक सिक्स आणि तीन चौकार आहेत.