IND vs AUS: एकही सामना न खेळता वरुण चक्रवर्ती भारतीय संघाबाहेर, वरुणच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

भारताच्या टी-20 संघात कोलकाता नाईट रायडर्स संघातील लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती याचा समावेश करण्यात आला होता.

IND vs AUS: एकही सामना न खेळता वरुण चक्रवर्ती भारतीय संघाबाहेर, वरुणच्या जागी 'या' खेळाडूला संधी
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 9:35 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या मोसमानंतर टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India tour of Australia ) घोषित करण्यात आलेल्या संघात आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. या युवा खेळाडूंमध्ये शुभमन गिल, नवदीप सैनी आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) या खेळाडूंचा समावेश करण्यात आल्यामुळे हे खेळाडू आनंदात होते. परंतु यापैकी एका खेळाडूच्या आनंदावर विरझण पडलं आहे.

भारताच्या टी-20 संघात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती याचा समावेश करण्यात आला होता. परंतु संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी आणि एकही सामना खेळण्यापूर्वीच वरुण चक्रवर्ती संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी सनरायझर्स हैदराबाद संघातील जलगदगती गोलंदाज थंगारासू नटराजनचा (T. Natrajan) समावेश करण्यात आला आहे.

खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर

वरुण चक्रवर्तीच्या खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत IPL सुरु होण्याच्या अगोदरपासूनच होती. परंतु त्यावर सर्जरी करण्याऐवजी वरुणने आयपीएलमध्ये खेळण्यास प्राधान्य दिले. आयपीएलमधील जबरदस्त परफॉर्मन्सच्या बळावर त्याची भारतीय टी-20 संघात निवड करण्यात आली. परंतु या निवडीपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने निवड समितीला वरुणच्या दुखापतीबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. परंतु कोलकात्याचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला वरुणच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. त्यानंतर बीसीसीआयने वरुणला भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय घेतला.

वरुणच्या जागी नटराजनची निवड

वरुणच्या जागी भारतीय टी-20 संघात टी. नटराजनची निवड झाली आहे. नटराजनला आयपीएलमधील शानदार परफॉर्मन्सचं योग्य फळ मिळालं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 16 सामन्यांमध्ये 16 बळी मिळवले आहेत.

नव्या यॉर्कर किंगचा उदय

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात नव्या यॉर्कर किंगचा उदय झाला आहे. थंगारासू नटराजन असं या यॉर्कर किंगचं नाव आहे. हैदराबादच्या या गोलंदाजाने यॉर्करच्या बाबतीत जसप्रीत बुमराहसारख्या स्पेशालिस्ट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक गोलंदाजांना मागे टाकलं आहे. त्याने या मोसमात सर्वाधिक यॉर्कर टाकण्याचा विक्रम केला आहे.

नटराजनने या मोसमात यॉर्कर बॉल टाकण्याच्या बाबतीत अनेक दिग्गज गोलंदाजांना मागे टाकलं. त्याने या मोसमात एकूण 54 वेळा यॉर्कर बॉल टाकला आहे. सर्वाधिक वेळा यॉर्कर बॉल टाकण्याच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर जेसन होल्डर आणि ट्रेन्ट बोल्ट आहेत. होल्डरने या मोसमात एकूम 25 वेळा यॉर्कर बॉल टाकला आहे. तर ट्रेन्ट बोल्टने 22 वेळा यॉर्कर टाकण्याची किमया केली आहे.

संबंधित बातम्या

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

IPL 2020 : हैदराबादच्या ताफ्यातील नव्या यॉर्कर किंगचा उदय, थंगारासू नटराजनने ट्रेन्ट बोल्ट, जेसन होल्डरला पछाडलं

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

(Ind vs AUS : Varun Chakravarthy replaces by T. Natrajan in Indian T-20 team for Australia tour)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.