IND vs ENG : ज्याने भारताला त्रास दिला, त्यालाच हार्दिकने धुतलं, याला म्हणतात बदला, VIDEO
IND vs ENG : हार्दिक पंड्याने पुण्यात चौथ्या T20 मध्ये कमालीची बॅटिंग करताना शानदार अर्धशतक झळकावलं. पंड्याने अवघ्या 27 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवताना 4 सिक्स मारले. पंड्याने पुण्यामध्ये त्याचा बदला सुद्धा पूर्ण केला. जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण?

टीम इंडियाने काल पुण्यात झालेल्या चौथ्या T20 सामन्यात इंग्लंडवर 15 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयात हार्दिक पंड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या हार्दिकला तिसऱ्या सामन्यातील पराभवासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं, त्याने चौथ्या मॅचमध्ये अशी बॅटिंग केली की, टीकाकारांची तोंड आपोआप बंद झाली. हार्दिक पांड्या 30 चेंडूत 53 धावांची इनिंग खेळला. त्याने तुफानी बॅटिंग केली. महत्त्वाच म्हणजे टीम इंडिया अडचणीत असताना हार्दिक पांड्या ही इनिंग खेळला. तिसऱ्या सामन्यात हार्दिकने 40 धावा करुन 2 विकेट घेतल्या होत्या. ऑलराऊंडर प्रदर्शन त्याने केलं होतं. मात्र, त्याला पराभवासाठी जबाबदार ठरवलेलं. त्याच हार्दिकने चौथ्या सामन्यात आपल्या बॅटने सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली.
टीम इंडियाचे विकेट पडलेले आणि रनरेट कमी होता, त्यावेळी हार्दिक ही तुफानी इनिंग खेळून गेला. पंड्याने अवघ्या 27 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. राजकोटच्या तिसऱ्या T20 सामन्यात हार्दिक पंड्याने 40 धावा करण्यासाठी 35 चेंडू खेळले होते. त्याचा स्ट्राइक रेट 120 पेक्षा कमी होता. अखेरच्या ओव्हरमध्ये त्याने ध्रुव जुरेलला स्ट्राइक दिली नव्हती. त्यानंतर तो स्वत: सुद्धा आऊट झालेला. हार्दिकवर यासाठी बरीच टीका झाली होती. माजी विकेटकीपर पार्थिव पटेल हे सुद्धा बोललेला की, हार्दिक पंड्याने सेट होण्यासाठी इतके चेंडू घेऊ नये. कदाचित पंड्यापर्यंत हे सर्व पोहोचलं असावं म्हणून पुण्यामध्ये तो पूर्णपणे वेगळा वाटला.
ज्याने भारताला अडचणीत आणलं, त्यालाच हार्दिकने धुतलं
हार्दिक पंड्याने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना फोडून काढलं. त्याने चार सिक्स मारले. दोन सिक्स साकिब महमूदच्या चेंडूवर मारले. हा तोच बॉलर आहे, ज्याने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये भारताच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलेलं. पण पंड्याने त्याच्याच गोलंदाजीवर हल्ला चढवला. त्यानंतर त्याने जोफ्रा आर्चर आणि जेमी ओवर्टनच्या चेंडूंवर सिक्स मारले.
Dances down the track ✅ Times his shot to perfection 👍 Puts one into the stands 👌
Hardik Pandya 🤝 MAXIMUM
Follow The Match ▶️ https://t.co/pUkyQwxOA3 #TeamIndia | #INDvENG | @hardikpandya7 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nQkUdGB2u8
— BCCI (@BCCI) January 31, 2025
हार्दिक-दुबेमध्ये किती रन्सची पार्टनरशिप?
हार्दिक पांड्या सुंदर खेळलाच पण दुसऱ्या टोकाकडून शिवम दुबेने सुद्धा शानदार बॅटिंग केली. डावखुऱ्या शिवम दुबेने सुद्धा हाफ सेंच्युरी झळकवली. त्याने 53 धावा केल्या. पंड्या आणि दुबेने 45 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. त्यामुळेच टीम इंडियाची धावसंख्या 181 पर्यंत पोहोचली. टीम इंडियाची ही धावसंख्या यासाठी खास आहे, कारण संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव एकाच ओव्हरमध्ये आऊट झाले होते. अभिषेक शर्मा आणि रिंकूने धावगती वाढवली. पण ते मोकळेपणाने फटेकबाजी करु शकले नाहीत.