VIDEO : भर पत्रकार परिषदेत इंग्लंडच्या गोलंदाजाच्या डोक्यावर बोर्ड कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

इंग्लंडचा गोलंदाज डॉम बेस याच्यासोबत एक विचित्र प्रकार घडला (IND vs ENG test Advertisement Board fall on Dom Bess).

VIDEO : भर पत्रकार परिषदेत इंग्लंडच्या गोलंदाजाच्या डोक्यावर बोर्ड कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 8:43 PM

चेन्नई : इंग्लंडचा गोलंदाज डॉम बेस याच्यासोबत एक विचित्र प्रकार घडला. रविवारी (7 फेब्रुवारी) संध्याकाळी पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्याच्या मागे उभा असलेला एक अॅडव्हरटायझिंग बोर्ड कोसळला. मात्र, सुदैवाने तो बोर्ड वजनाने हल्का असल्याने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. बोर्ड डोक्यावर पडल्यानंतर बेसने त्याकडे लक्ष दिलं नाही. तो पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देत राहिला. टीमच्या स्टाफमधील एका व्यक्तीने तो बोर्ड पुन्हा पाठीमागे उभा केला. (IND vs ENG test Advertisement Board fall on Dom Bess).

डॉम बेस सध्या इंग्लंडच्या संघातील यशस्वी गोलंदाज ठरत आहे. त्याने पहिल्या डावात तब्बल चार भारतीय फलंदाजांच्या विकेट घेतल्या. यामध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत अशा दिग्गजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बेस हा पहिल्यांदाच भारताविरोधात खेळत आहे. डॉम बेसने विराट कोहलीच्या विकेटवर आनंद व्यक्त केला आहे.

“विराट कोहली हा एक जबरदस्त खेळाडू आहे. तो वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. त्यामुळे विराटची विकेट घेणं, ही आनंदाची बाब आहे”, असं डॉम बेस म्हणाला (IND vs ENG test Advertisement Board fall on Dom Bess).

“असं नाही की, मी काही चमत्कार केला. मी दहा-पंधरा बॉल चांगल्या जागेवर टाकले होते. तेव्हा कुठे काही चांगलं घडलं. हा सगळा एका प्रोसेसचा भाग झाला. पण त्यांची विकेट घेतली याचा आनंद आहे”, असंदेखील त्याने सांगितलं.

भारताला 420 धावांचा टार्गेट

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यात चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा (8 फेब्रुवारी) चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खेळ संपला तेव्हा शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत होते. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने दिवसखेर 1 विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. यामुळे पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 90 षटकांमध्ये 381 धावांचे आव्हान असणार आहे. तर इंग्लंडला जिंकण्यासाठी 9 विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे पाचव्या दिवशी नक्की काय निकाल लागणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातमी : Chennai Test Report : इंग्लंडविरोधात ‘मिशन 420’, टीम इंडियासाठी पाचवा दिवस ‘मंगल’ ठरणार?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.