Suryakumar Yadav : Hattrick चांगली असते, पण सूर्यसारखी एकाच मॅचमध्ये दोन हॅट्ट्रीक नको रे बाबा
Suryakumar Yadav : भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार मॅचच्या T20 सीरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने एकाच मॅचमध्ये डबल हॅट्ट्रीक केलीय. टीम इंडियाला सीरीजमध्ये आघाडी मिळवून देण्यात तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाचा T20 कॅप्टन सूर्यकुमार यादवने मोठ काम केलय. सूर्यकुमार यादवने या सामन्यात एक नाही, तर तब्बल दोन हॅट्ट्रीक केल्या. सेंचुरियनच्या हाय स्कोरिंग मॅचमध्ये भारताने 11 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे मालिकेत पराभूत होण्याचा धोका आता टळला आहे. भारतीय टीमने चार मॅचच्या T20 सीरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला सीरीजमध्ये आघाडी मिळवून देण्यात तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलीच. पण त्याचवेळी सूर्युकमार यादवने डबल हॅट्ट्रीक सुद्धा केली.
तुम्ही म्हणालं सूर्यकुमार यादवने डबल हॅट्ट्रीक कशी पूर्ण केली?. याचं उत्तर भारतीय कॅप्टनच्या टॉसच्या नशिबाशी संबंधित आहे तसच त्याच्या फलंदाजीशी सुद्धा जोडलेलं आहे. सोप्या शब्दात सांगायच झाल्यास सूर्यकुमार यादवने टॉस हरण्यात आणि फलंदाजीत फेल होण्याची हॅट्ट्रीक पूर्ण केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या T20 सीरीजमध्ये सूर्यकुमार यादव अजूनपर्यंत एकदाही टॉस जिंकलेला नाही. डरबनमधल्या T20 सामन्यापासून टॉस हरण्याचा सिलसिला सुरु झाला. सेंच्युरियनच्या तिसऱ्या T20 मध्ये तो हॅट्ट्रीकमध्ये बदलला. कदाचित चौथ्या सामन्यात सूर्या टॉस हरण्याचा चौकार मारु शकतो. सीरीजमध्ये एकही टॉस न जिंकणारा कॅप्टन सुद्धा तो बनू शकतो.
सूर्याचा बेस्ट स्कोर काय?
टॉसच्या बाबतीत सूर्यकुमार यादवची जी स्थिती आहे, फलंदाजीतही तशीच स्थिती आहे. डरबन ते सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या तीन T20 सामन्यात त्याने फक्त 26 धावा केल्या आहेत. यात दोन मॅचमध्ये तो दोन आकडी धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही. या सीरीजमध्ये त्याचा बेस्ट स्कोर फक्त 21 रन्स आहे.
‘कारण ते कोणाच्या हातात नसतं’
सूर्यकुमार यादवने ज्या हॅट्ट्रीक केल्यात, त्या कुठल्याही कॅप्टनला कधीच आपल्या टीमसाठी कराव्या वाटणार नाहीत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत T20 सीरीजचा चौथा आणि शेवटचा सामना जोहान्सबर्गमध्ये होणार आहे. टीम इंडियाकडे किताब जिंकण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादवचा फलंदाजीत दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. टॉसबद्दल बोलू शकत नाही, कारण ते कोणाच्या हातात नसतं.