Suryakumar Yadav Century: आपलं ठरलय! बॉल कुठेही टाका राव, सूर्याने श्रीलंकेच्या कुठल्या बॉलरला किती धुतलं? VIDEO
Suryakumar Yadav Century: सूर्याच्या शतकाच ‘पोस्टमार्टम’, सूर्याच्या ज्वाळांमध्ये काल लंकेचे गोलंदाज चांगलेच होरपळले. बॉल कुठे टाकायचा त्यांना प्रश्न पडलेला
राजकोट: टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादवची बॅट काल राजकोटमध्ये तळपली. त्याने तुफानी बॅटिंग करताना शतक ठोकलं. त्यामुळे श्रीलंकेचा पराभव निश्चित झाला. सूर्याच्या या शतकाची बरीच चर्चा आहे. कारण या सेंच्युरीमुळे अनेक रेकॉर्ड मोडले गेले. सूर्याच्या सेंच्युरीमुळे कुठले रेकॉर्ड मोडले गेले? यापेक्षा सूर्याने ही सेंच्युरी कशी केली? याचीच जास्त चर्चा होणार आहे. आम्ही सूर्याच्या सेंच्युरीच पोस्टमार्टम करणार आहोत.
श्रीलंकेने सूर्या विरुद्ध किती गोलंदाज वापरले?
श्रीलंकन टीमने सूर्यकुमार यादवला रोखण्यासाठी राजकोट T20I मध्ये 5 गोलंदाज वापरले. एकही गोलंदाज सूर्याविरुद्ध प्रभावी ठरला नाही. उलट त्यांची भरपूर धुलाई झाली. स्पिनर असो, वा पेसर. सूर्यकुमारने श्रीलंकेच्या प्रत्येक गोलंदाजाची जोरदार धुलाई केली.
बॉल कुठेही टाका, फोर, सिक्स ठरलाय. Suryakumar Yadav ची शतकी खेळी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
45 चेंडूत सूर्याच तुफानी शतक
राजकोट T20I मध्ये सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत शतकाची स्क्रिप्ट लिहीली. भारताकडून T20I मध्ये झळकवलेल हे दुसरं वेगवान शतक आहे. राजकोट मैदानावर T20 इंटरनॅशनलमधील हे दुसरं शतक आहे. सूर्याने आपल्या तुफानी इनिंगमध्ये 51 चेंडूत 112 धावा चोपल्या . 219.60 च्या स्ट्राइक रेटने त्याने 9 सिक्स आणि 7 चौकार लगावले.
श्रीलंकन गोलंदाज | चेंडू | धावा | स्ट्राइक रेट |
---|---|---|---|
हसारंगा | 11 | 13 | 118.2 |
तीक्ष्णा | 13 | 28 | 215 |
करुणारत्ने | 10 | 23 | 230 |
मधुशंका | 08 | 30 | 350 |
रजित | 02 | 07 | 350 |
सूर्यकुमार यादव vs 5 श्रीलंकन बॉलर्स
श्रीलंकेने 5 गोलंदाज वापरले, तरी सूर्याने शतक झळकावलं. त्याने सर्वाधिक धावा कुठल्या बॉलर विरुद्ध केल्या?. सर्वाधिक स्ट्राइक रेटने त्याने कुठल्या गोलंदाजाला कुठलं? कुठल्या गोलंदाजी कमी धुलाई झाली? सर्वात जास्त मार ‘या’ बॉलरला पडला
सूर्याने करुणारत्नेला 230 च्या स्ट्राइक रेटने धुतलं. त्याच्या 10 चेंडूत 23 धावा लुटल्या. मधुशंकाला त्याने सर्वात जास्त धुतलं. मधुशंका आणि रजितला त्याने 350 च्या स्ट्राइक रेटने फटकावलं. सूर्याने मधुशंका विरोधात 8 चेंडूत 30 आणि रजित विरोधात 2 चेंडूत 7 धावा केल्या.