महिला एकदिवसीय विश्वचषक (womens world cup) स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या ((IND Vs WI) सामन्यात आज भारतीय संघानं इंडिजला 155 रनानं हरवलं आहे. या भारतीय महिला संघाच्या धडाकेबाज कामगिरीचं कौतुक होतंय. या सामन्यात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी इंडिजला धो धो धुतलंय. आता अनुभवी गोलंदाज समोर असल्यानं इंडिजला धडकी भरणारच. पण, झुलनजा इंडिजला धुतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय आहे. त्यामध्ये तिच्या तुफान गोलंदाजीनं इंडिजलाही धडकी भरली होती. भारतीय संघानं (indian team) पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 बाद 317 रन केले होते. या सामन्यात स्नेह राणानं सगळ्यात जास्त 3 आणि मेघना सिंहनं 2 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. तिन सामन्यात भारतीय संघाचा हा दुसरा धडाकेबाज विजय आहे.
India seal a big 155-run win over West Indies ?#CWC22 pic.twitter.com/0VFyqxxnuB
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 12, 2022
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये महिला विश्वचषक स्पर्धेत सामन्यात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी इंडिजला धो धो धुतलं. आता अनुभवी गोलंदाज समोर असल्यानं इंडिजला धडकी भरणारच. पण, झुलनजा इंडिजला धुतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय. त्यामध्ये तिच्या तुफान गोलंदाजीनं इंडिजलाही धडकी भरल्याचं दिसतंय. भारतीय संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 बाद 317 रन केले होते. भारतीय महिला संघाच्या महिला विश्वचषक स्पर्धेतील हा सर्वोच्च स्कोअर केले. 318 रनचा पाठलाग वेस्ट इंडिजला 162 रनंच बनवता आले.
Another feather in her cap ?
Jhulan Goswami now holds the record for the most wickets in the history of the Women’s Cricket World Cup.#CWC22 pic.twitter.com/wiCghJZjkk
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 12, 2022
मिताली राजनं महिला विश्वचषकात कर्णाधर म्हणून सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. हा विक्रम या पूर्वी ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता. तिनं आतापर्यंत कर्णधार म्हणून 23 सामने खेळले आहेत. संघाचे नेतृत्व करण्याचा मितालीला मोठा अनुभव देखील आहे. तिनं दमदार खेळाच्या जोरावर भारतीय संघातलं तिचं स्थान बळकट केलं आहे. यापूर्वी मितालीनं महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अशा 6 सत्रांमध्ये खेळणारी पहिली खेळाडू म्हणून मान मिळवला होता. आता मितालीनं हा विक्रम केल्यानं ती थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत जाऊन बसली होती.
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या शतकांमुळे न्यूझीलंडमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या शतकांचा विक्रमही मोडला. 1982 पासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताने न्यूझीलंडमध्ये केवळ एकच शतक झळकावले होते. पण आता एकाच सामन्यात दोन शतके झाली आहेत. त्याचवेळी स्मृती मानधनाने वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दुसरे शतक झळकावले. 2017 च्या विश्वचषकातही त्याने याच संघाविरुद्ध शतक झळकावले होते.
इतर बातम्या