Marathi News Sports India missing ms dhoni in run chasing says wi michael holding
Photo | कर्णधार कोहलीला सतावतेय महेंद्रसिंग धोनीची कमी, वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूचं मत
Follow us
भारतीय संघाला पर्यायाने कर्णधार विराट कोहलीला दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीची कमी जाणवतीये, असं मत वेस्ट इंडिजचा फास्ट बोलर्स मायकल होल्डिंग याने व्यक्त केलं आहे.
भारतीय संघात अनेक दिग्गज बॅट्समन आहेत. त्यांच्यात प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व ठेवण्याची ताकद आहे. अशाही परिस्थितीत धावांचा पाठलाग करताना जो संयम हवा आणि आक्रमकपणा हवा, तो धोनीकडे होता. त्याचीच कमी आज भारतीय संघाला जाणवती आहे, असं मत होल्डिंग याने मांडलं आहे.
पहिल्या वनडेमध्ये 375 इतक्या विशाल धावांचा पाठलाग करणं भारतासाठी सोपं नव्हतं. यावेळी भारताला निश्चित धोनीची कमी जाणवली. धोनी सर्वसाधारण पाचव्या किंवा सहाव्या नंबरला बॅटिंग करायचा. धावांचा पाठलाग करण्यात त्याच्याएवढं माहिर कोणीही नव्हतं. त्याने ते कौशल्य अनेकवेळा दाखवलं, असं होल्डिंग म्हणाला.
भारतीय संघात अनेकजण आक्रमक खेळ करु शकतात. पहिल्या वनडेमध्ये हार्दिकची खेळी पाहण्यासारखी होती. परंतु कौशल्याएवढाच अनुभव देखील महत्त्वाचा असतो, असंही होल्डिंगने म्हटलं.
टॉस जिंकून एम एस धोनी फिल्डिंग करण्याला कधीही घाबरला नाही. कारण त्याला आपल्या कौशल्याची आणि आपल्या स्ट्रेन्थची जाणीव होती. आपल्या ध्येयापासून धोनी कधीही विचलित होत नसे, असंही होल्डिंगने म्हटलं.