IND vs SA: द्रविड-विराटच्या टीममध्ये झाला जोरदार सामना, दक्षिण आफ्रिकेत दिसला ‘चक दे इंडिया’चा सीन
भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा फिटनेस आणि उत्साह वाखाणण्याजोगा होता. सामना सुरु असताना द्रविड यांच्या कौशल्यपूर्ण खेळाचं विराटनेही कौतुक केलं.
जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेल्या भारतीय संघाचा क्वारंटाइनचा कालावधी संपला असून टीमने सराव सुरु केला आहे. टीम इंडियाने व्यायामावर भर देत धावण्याने ट्रेनिग सेशनची सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय संघाच्या पहिल्या ट्रेनिंग सेशनचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या टि्वटर अकाऊंटवर शेअर केला आहे. भारतीय संघासोबत असलेले स्ट्रेंथ अँड कंडीशनिंग कोच सोहम देसाई यांनी ट्रेनिंग सेशन मागची भूमिका समजावून सांगितली.
रनिंगने ट्रेनिंग सेशनची सुरुवात केल्यानंतर खेळाडूंनी फुटवॉलीचा खेळ खेळला. फुटवॉली म्हणजे फुटबॉल आणि वॉलीबॉलचा संगम असलेला खेळ आहे. फुटवॉलीसाठी दोन टीम्स तयार करण्यात आल्या होत्या. यात एका टीमचे नेतृत्व हेड कोच राहुल द्रविड यांच्याकडे, तर दुसरी टीम कसोटी कर्णधार विराट कोहलीची होती. संघातील खेळाडूंमध्ये समन्वय वाढवण्यासाठी फुटवॉलीचा खेळ निवडला, असं स्ट्रेंथ अँड कंडीशनिंग कोच सोहम देसाई यांनी सांगितलं. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी खेळाडूंना या फुटवॉली खेळाचा फायदा होईल, असे देसाई म्हणाले.
द्रविडच्या खेळाचं विराटकडून कौतुक बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये खेळाडू एकत्र धावताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून शाहरुख खानच्या चक दे इंडिया चित्रपटातील सीन आठवला. फुटवॉली खेळण्यात रमलेले खेळाडू हास्य-विनोद करताना परस्परांची फिरकी सुद्धा घेत होते. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा फिटनेस आणि उत्साह वाखाणण्याजोगा होता. सामना सुरु असताना द्रविड यांच्या कौशल्यपूर्ण खेळाचं विराटनेही कौतुक केलं.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी निर्माण झालेला वाद, तणाव याची छाया ट्रेनिंग सेशनमध्ये अजिबात दिसली नाही. उलट खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा आनंद लुटताना दिसले.
How did #TeamIndia recharge their batteries ahead of their first training session in Jo’Burg? ?
On your marks, get set & Footvolley! ☺️???#SAvIND pic.twitter.com/dIyn8y1wtz
— BCCI (@BCCI) December 18, 2021
कालही बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबई ते जोहान्सबर्ग विमान प्रवासात भारतीय खेळाडू आनंदी मूडमध्ये दिसले होते. विराट कोहलीने विमान प्रवासात इशांत शर्माची चांगलीच फिरकी घेतली. सूटकेस सोबत असेल, तर इशांत जगात कुठेही प्रवास करण्यासाठी तयार आहे असे विराट या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो. त्यावर इशांतने सकाळी, सकाळी हे काम करु नकोस, असे त्याला सांगितले.
संबंधित बातम्या:
VIDEO: सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं त्याचं वाईट वाटलं; रामदास कदम यांची नेमकी खदखद काय? Ramdas Kadam| कदमांचे 5 वार; शिवसेना संपवण्याची हरामखोरी मंत्र्यांकडून सुरू, उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कारवाईची मागणी Shivaji Maharaj Statue | ‘विटंबना छोटी गोष्ट! ‘छत्रपतींच्या पुतळ्यावरील वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं धक्कादायक विधान