INDIA TOUR AUSTRALIA | ‘यॉर्कर किंग’ थंगारासू नटराजनचा नेट्स प्रॅक्टिसमध्ये कसून सराव, टिच्चून मारा, फलंदाज हैराण

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे.

INDIA TOUR AUSTRALIA | ‘यॉर्कर किंग’ थंगारासू नटराजनचा नेट्स प्रॅक्टिसमध्ये कसून सराव, टिच्चून मारा, फलंदाज हैराण
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 7:10 PM

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ( India Tour Australia) 2 दिवसांपूर्वी सिडनीमध्ये दाखल झाली. यानंतर भारतीय खेळाडूंची आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंची आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली. यानंतर भारतीय खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करतायेत. टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत. यॉर्करकिंग थंगारासू नटराजन नेट्समध्ये सरावादरम्यान आपल्या खेळाडूविरुद्ध टिच्चून मारा करताना दिसतोय. या सरावाचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये थंगारासू गोलंदाजी करताना दिसतोय. india tour australia yorker king thangarasu natarajan practices hard in the nets video shared by bcci

या व्हिडीओमध्ये थंगारासून बाऊन्सर चेंडू टाकताना दिसतोय. थंगारासूच्या गोलंदाजीचं सामना करताना भारतीय फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडालेली पाहायला मिळाली.

वरुणची दुखापत नटराजनच्या पथ्यावर

आयपीएलच्या 13 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) खेळताना चांगली गोलंदाजी केली. या मोसमात तो यॉर्करकिंग म्हणून उदयास आला. दुर्देवाने वरुण चक्रवर्थी दुखापतग्रस्त झाला. वरुणची दुखापत थंगारासूच्या पथ्यावर पडली. थंगारासूला वरुणच्या जागी संधी देण्यात आली.

सर्वाधिक यॉर्करचा विक्रम

आयपीएलच्या 13 व्या मोसमात थंगारासू यॉर्कर किंग म्हणून उदयास आला. जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गोलंदाजांना न जमलेली कामगिरी नटराजनने केली. नटराजनने या मोसमात सर्वाधिक यॉर्कर टाकण्याचा विक्रम केला. नटराजनने आयपीएलच्या 13 व्या मोसमात एकूण 54 वेळा यॉर्कर बॉल टाकला. नटराजनने या मोसमातील 16 सामन्यांमध्ये 16 बळी मिळवले.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 2 महिन्याचा हा ऑस्ट्रेलिया दौरा असणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. 27 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या :

India Tour Australia | विराट कोहली क्रिकेट विश्वातील पावरफुल खेळाडू, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराकडून कौतुक

IND vs AUS: एकही सामना न खेळता वरुण चक्रवर्ती भारतीय संघाबाहेर, वरुणच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

india tour australia yorker king thangarasu natarajan practices hard in the nets video shared by bcci

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.