India Tour Australia | ठरलं! अखेर हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पण….
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे.
मुंबई : हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापतीमुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून India tour of Austrellia 2020) वगळले होते. त्यामुळे त्याचे चाहते कमालीचे नाराज झाले होते. मात्र दुसरीकडे दुखापतग्रस्त असूनदेखील तो आयपीलमध्ये (IPL 2020) मुंबईच्या (Mumbai Indians) संघाकडून खेळतो आहे. यावरच प्रकाशझोत टाकत अनेकांनी बीसीसीआयवर (BCCI) टीकेची झोड उठवली. आज खेळाडूंचे मेडिकल रिपोर्टस आल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये रोहित शर्माला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. (India tour of Austrellia 2020 Rohit Sharma in For last 3 test match)
भारताच्या मेडिकल टीमकडून बीसीसीआयला खेळाडूंच्या दुखापतीचे अहवाल मिळाल्यानंतर बीसीसीआयने हे बदल केले आहेत. रोहितला कसोटी संघात संधी दिली असली तरी एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेसाठी त्याला विश्रांतीच देण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) अॅडलेडमधल्या पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. जानेवारी महिन्यात तो बाबा होणार आहे. बीसीसीआयकडून विराटला पॅटनिर्टी लिव्ह मंजूर करण्यात आली आहे.
कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्मा दुखापतीतून बरा होण्याची अपेक्षा आहे. रोहित शर्मा सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या आयपीएल (IPL 2020) मध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये मंगळवारी लढत होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे.
टीम इंडियासाठी अनफिट आणि आयपीएलसाठी फिट?
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड झाली तेव्हा रोहित शर्मा दुखापतीमुळे अनफिट असल्याचे कारण देत त्याला वगळ्यात आले. रोहित शर्माला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर रोहित शर्मा आयपीएलच्या अखेरच्या लीग मॅचमध्ये हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरला होता. यावरुन बीसीसीआय आणि निवड समितीला टीकेला सामोरे जावे लागले होते.
(India tour of Austrellia 2020 Rohit Sharma in For last 3 test match)
संबंधित बातम्या
Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, बीसीसीआयकडून डॅमेज कंट्रोल?
India Tour Australia | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यात विराट खेळणार नाही