2023 AFC Asian Cup qualifiers : भारत vsअफगानिस्तान सामना अनिर्णीत, 7 मिनिटांत स्कोरबोर्डवर 2 गोल
भारतीय फुटबॉल संघही 2023 AFC Asian Cup मध्ये पात्र होण्यासाठी जीवाचे रान करत आहे. या पात्रता फेरीच्या सामन्यांत भारत मंगळवारी अफगानिस्तानशी भिडला.
कतार : युरोपियन देशात प्रसिद्ध असणारा फुटबॉलमध्ये आता आशियाई देशही सहभाग घेत आहेत. भारतीय फुटबॉल संघही 2023 AFC Asian Cup मध्ये पात्र होण्यासाठी जीवाचे रान करत आहे. या पात्रता फेरीच्या सामन्यात भारताला मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये अफगानिस्तान विरुद्धचा सामना अनिर्णीत सोडण्यात यश आलं. दोन्ही संघानी 1-1 गोल करुन सामना बरोबरीत सोडला. सामन्यात पहिला गोल भारताने करताच अफगानिस्तानने परतफेड करत सामन्यात पुनरागमन केले. (India vs Afghanistan Match Draw India reached in third round of AFC Asian Cup qualifiers)
भारत आणि अफगानिस्तान सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघाकडून सुमार खेळ दाखवला गेला. हाल्फ टाइमपर्यंत दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे सामन्याचे पहिले 45 मिनिटात स्कोरबोर्डवर एकही गोल नव्हता. पण दुसरा हाल्फ सुरु होताच सामन्यात दोन्ही संघानी चुरशीचा खेळ दाखवायला सुरुवात केली. दोन्ही संघानी गोल करण्याचे प्रयत्न जोमात सुरु केले.
7 मिनिटांत अफगानिस्तानकडून परतफेड
दुसऱ्या हाल्फनंतर दोन्ही संघानी जोमात खेळ सुरु करताच भारताच्या आशिक कुरनियन याने. 75 व्या मिनिटाला गोल करत भारताला सामन्यात आघाडी मिळवून दिली. पण भारताचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही पुढच्या 7 मिनिटातच अफगानिस्तानकडून होसेन जमानिने 82 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली.
सामना ड्रॉ होऊनगी भारत पुढच्या फेरीत
अफगानिस्तान विरुद्धचा सामना ड्रॉ झाला. मात्र याआधीच्या सामन्यातील रेकॉर्डच्या जोरावर भारताने 2023 AFC Asian Cup मध्ये तिसऱ्या फेरीत झेप घेतली. भारत ग्रुप E मध्ये तिसऱ्या स्थानावर असून अफगानिस्तान चौथ्या स्थानावर आहे.
??? ????? ?
Now onto the next round! ?#WCQ ? #BackTheBlue ? #IndianFootball ⚽ #BlueTigers ? pic.twitter.com/RNbbeDU8jZ
— Indian Football Team (@IndianFootball) June 15, 2021
हे ही वाचा –
भारतीय फुटबॉलपटूची कमाल, गोल्समध्ये मेस्सीला मागे टाकलं
तिन्ही लीगमध्ये रोनाल्डोचाच डंका! इंग्लंड, स्पेन गाजवल्यानंतर आता इटलीतही रोनाल्डोची यशस्वी वाटचाल
देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी 39 वर्षीय खेळाडू मैदानात, निवृत्तीच्या 5 वर्षांनी पुनरागमन
(India vs Afghanistan Match Draw India reached in third round of AFC Asian Cup qualifiers)