IND vs AUS Test: चित्ते की चाल…! केएस भारतची पहिल्याच कसोटीत जबरदस्त स्टंपिंग, पाहा Video
India vs Australia 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाला 177 धावांवर रोखलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ही मालिका 3-0 ने जिंकायची आहे.
नागपूर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामना नागपूरमध्ये सुरु आहे. पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला 177 धावांवर रोखलं. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाच्या फिरकीपुढे कांगारुंचं काहीच चाललं नाही. रविंद्र जडेजाने 5, आर. अश्विननं 3, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक गडी बाद केला. असं असताना कसोटी सामन्यातून पदार्पण करणार विकेटकीपर बॅटर केएस भारतनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी केएस भारत प्रयत्नशील आहे. त्याने केलेल्या स्टंपिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्या डावात मार्नस लाबुशेन मैदानावर तग धरून होता. त्याला बाद करणं गोलंदाजांना कठीण जात होतं. पण तो 49 या धावसंख्येवर असताना केएस भारतनं जलदगतीनं स्टंपिंग करत तंबूचा रस्ता दाखवला.
पहिल्या डावातील 36 वं षटक रविंद्र जडेजाला सोपवण्यात आलं. या षटकाच्या पाचवा चेंडू मार्सनकडून सुटला. ही संधी विकेटकीपर केएस भारतनं साधली आणि त्रिफळा उडवला. मार्सनला नेमकं काय झालं तेच कळलं नाही. पण पंचांनी बाद घोषित केलं आणि मार्सन तंबूत परतला. मार्सननं 123 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 49 धावा केल्या होत्या. केएस मार्सनच्या स्टंपिंगची तुलना आता माजी विकेटकीपर बॅटर एमएस धोनीशी केली जात आहे. कारण धोनी असाच चपळतेने बॅटर्संना तंबूचा रस्ता दाखवायचा.
Welcome back JADEJA
2 wickets in 2 balls
Jadeja dismisses Labuschagne(49) and Renshaw(0).#INDvsAUS #Jadeja pic.twitter.com/OsWuGWJD3p
— Cricket Fan (@Cr1cket_Fan) February 9, 2023
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा ही जोडी मैदानात उतरली. मात्र दुसऱ्या षटकातच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. उस्मान ख्वाजा पायचीत होत तंबूत परतला. मोहम्मद सिराजनं त्याला अवघ्या एका धावेवर बाद केलं.त्यानंतर लगेचच तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजनं धक्का दिला. डेविड वॉर्नर एका धावसंख्येवर असताना त्रिफळाचीत केलं. ऑस्ट्रेलियन संघ दबावात असताना मार्सन लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ जोडीनं डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी केली. मात्र केएस भारतनं चपळतेने केलेल्या स्टंपिंगमुळे मार्सन 49 या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर आलेला मॅट रेनशॉ भोपळाही फोडू शकला नाही. जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. स्टीव स्मिथ 37, एलेक्स कॅरे 36, पॅट कमिन्स 6, टोड मर्फी 0, पीटर हँडस्कॉम्ब 31, स्कॉट बोलँड 1 अशा धावा करून बाद झाले.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.