India vs Bangladesh 1st Test Day 1, : भारत आणि बांग्लादेशमध्ये पहिला कसोटी सामना बुधवारी सुरु झाला. भारताने पहिल्या दिवशी 6 विकेट गमावून 278 धावा केल्या आहेत. भारताकडून चेतेश्वर पुजाराने 90 आणि ऋषभ पंतने 46 धावा केल्या. श्रेयस अय्यर 82 धावा बनवून नाबाद आहे. बांग्लादेशसाठी तैजुल इस्लामने तीन, मेहदी हसनने दोन विकेट घेतल्या. भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन: झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (क), लिटन दास, नुरुल हसन, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद आणि इबादत हुसेन
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज
कुलदीप-सिराजच्या बळावर बांगलादेशची झुंज, 102 धावांत 8 विकेट पडल्या
कुलदीप यादवने शकीब अल हसनला बाद केल्याने बांगलादेशचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
उमेश यादवने त्याच्या दुसऱ्या (चौथ्या डावातील) षटकातील तिसऱ्या चेंडूवर यासिर अलीला (4) बोल्ड केले.
सिराजने डावाच्या पहिल्याच चेंडूवर टीम इंडियाला यश मिळवून दिले. त्याने बांगलादेशचा सलामीवीर नजमुल हसन शांतोला (0) ऋषभ पंतकडे विकेटच्या मागे झेलबाद केले. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या आहेत. यासिर अली फलंदाजीला आला.
बांगलादेशची दुसरी विकेट पडली, सिराजनंतर उमेशने दिला धक्का
भारतीय संघाला 8 वा धक्का बसला. अश्विन 58 धावा करून यष्टिचित झाला. मेहदी हसन मिराजने त्याला शिकार बनवले. अश्विनने 113 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार आणि तब्बल षटकार ठोकले. 385 च्या सांघिक स्कोअरवर भारताला 8वा धक्का बसला. उमेश यादव फलंदाजीला आला.
अश्विनने कसोटी कारकिर्दीतील 13वे अर्धशतक झळकावले. तैजुल इस्लामच्या डावातील १२३व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने एकच धाव घेतली आणि वैयक्तिक धावसंख्या 50 वर आणली.
अश्विनने 13वे कसोटी अर्धशतक झळकावले, टीम इंडिया 400 धावांच्या जवळ
दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या दोन तासांत भारताने 30 षटकांत 1 गडी गमावून 70 धावा केल्या. आर अश्विन ४० धावा करून खेळत आहे तर कुलदीप यादव २१ धावा करून नाबाद आहे.
भारतीय संघाने 114 षटकात 7 गडी गमावून 329 धावा केल्या आहेत. सध्या रविचंद्रन अश्विन 32 आणि कुलदीप यादव 10 धावा करून क्रीजवर आहेत. टीम इंडियाला 400 धावांच्या पुढे नेण्याची जबाबदारी रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांच्यावर आहे.
भारतीय संघाने 111 षटकात 7 गडी गमावून 320 धावा केल्या आहेत. सध्या रविचंद्रन अश्विन 28 आणि कुलदीप यादव 10 धावा करून खेळत आहेत. मेहदी हसन मिराजच्या शेवटच्या षटकात केवळ एक धाव झाली.
भारताच्या 300 धावा 102.2 षटकात पूर्ण झाल्या. अश्विनने मेहदी हसन मिराजचा एकल चेंडू घेत संघाची धावसंख्या 7 गडी बाद 300 अशी केली. सध्या अश्विन 18 धावा करून खेळत आहे तर कुलदीप यादवचे खातेही उघडलेले नाही.
श्रेयस अय्यरचे शतक हुकले
श्रेयस अय्यरचे शतक हुकले. त्याने 192 चेंडूत 86 धावांची शानदार खेळी केली. डावाच्या 98व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर इबादत हुसेनने त्याला बोल्ड केले. श्रेयसने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. 293 च्या सांघिक स्कोअरवर भारताची 7वी विकेट पडली. कुलदीप यादव फलंदाजीला आला.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन फलंदाजीला आले, तैजुल इस्लाम दुसऱ्या दिवसाचे पहिले षटक करतोय. सध्या श्रेयस अय्यर ८२ धावा करून नाबाद आहे.
या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे शतक हुकले. त्याने 203 चेंडूत 90 धावा केल्या. त्याच्या संयमी खेळीत 11 चौकारांचा समावेश होता.
श्रेयस अय्यर शतकाच्या जवळ, दुसऱ्या दिवसाचा खेळ काही वेळात सुरू होईल
खेळाची सुरुवात कशी होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने कसोटीच्या पहिल्यादिवशी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या 6 बाद 278 धावा झाल्या आहेत. पुजाराने 203 चेंडूत 90 धावा आणि श्रेयस अय्यरने 169 चेंडूत 82 रन्स केल्या आहेत.
चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांच्यातील 100 धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे. दोन्ही फलंदाज जबरदस्त चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. टीम इंडिया पहिल्या दिवशी मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.
भारताने 65 षटकात 4 गडी गमावून 207 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 63 आणि श्रेयस अय्यर 53 धावा करून खेळत आहेत.
या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केले आहे. श्रेय अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांनी आपापली अर्धशतके येथे पूर्ण केली आहेत. दोघांमध्ये 93 धावांची भागीदारीही झाली आहे. आता भारताची धावसंख्या 64.2 षटकात 205/4 झाली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी टी-ब्रेक झाला आहे. भारताची धावसंख्या 174/4 झाली आहे, श्रेयस अय्यर 41 आणि चेतेश्वर पुजारा 42 धावांवर नाबाद आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये 62 धावांची भागीदारी आहे.
सुरुवातीच्या 4 विकेट्स गमावल्यानंतर टीम इंडियाने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केले आहे. भारताची धावसंख्या आता 164 झाली आहे. टीम इंडियाची धुरा सांभाळणारा चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांच्यात महत्त्वाची भागीदारी झाली आहे. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत 52 धावा जोडल्या आहेत.
भारतीय संघाने 40 षटकांत 4 गडी गमावून 128 धावा केल्या आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा 71 चेंडूत 27 तर श्रेयस अय्यर 26 चेंडूत 10 धावा करून खेळत आहे.
दुसऱ्या सत्रात टीम इंडिया हळूहळू धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. भारताची धावसंख्या 125/4 झाली असून आता 38 षटके झाली आहेत. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर 8 आणि चेतेश्वर पुजारा 26 धावा केल्यानंतर क्रीजवर आहेत.
विकेट : भारतीय संघाला ऋषभ पंतच्या रूपाने चौथा धक्का बसला. डावाच्या 32व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. पंतने 45 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. श्रेयस अय्यर फलंदाजीला आला.
या सामन्यात ऋषभ पंतने आतापर्यंत 2 षटकार मारले आहेत. चेतेश्वर पुजारा दुसऱ्या टोकाला फलंदाजी करत आहे, त्याने 47 चेंडूत 22 धावा केल्या आहेत.
ऋषभ पंतने आपल्या शैलीत फलंदाजीला सुरुवात केली आहे, त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 100 च्या पुढे गेली आहे. आतापर्यंत ऋषभ पंतने 38 चेंडूत 36 धावा केल्या आहेत. तसेच चेतेश्वर पुजारासह पंतने आतापर्यंत 50 धावांची भागीदारी केली आहे.
दुपारच्या जेवणानंतर खेळ सुरू, ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आले आहेत. दुसऱ्या सत्रातील पहिले षटक इबादत हुसेन करत आहे. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर पंतचा झेल नुरुल हसनने चुकवला आणि चौकार मारला. या षटकात एकूण ५ धावा झाल्या.
तैजुल इस्लामच्या डावातील 26 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतने चौकार ठोकला. त्यानंतर पुजाराने चौथा चेंडू चौकारासाठी पाठवला. या षटकात एकूण 9 धावा झाल्या. उपाहारापर्यंत भारताने 26 षटकांत 3 गडी गमावून 85 धावा केल्या आहेत. सध्या पंत २९ धावांवर आहे तर पुजारा १२ धावा करून क्रीजवर आहे.
सध्या पंत २९ धावांवर आहे तर पुजारा १२ धावा करून क्रीजवर आहे.
india vs bangladesh score: भारतीय संघाने पहिल्या डावात 25 षटकात तीन गडी गमावून 76 धावा केल्या आहेत. सध्या ऋषभ पंत 23 चेंडूत 24 तर चेतेश्वर पुजारा 29 चेंडूत 8 धावा करून खेळत आहे. टीम इंडियाची तिसरी विकेट विराट कोहलीच्या रूपाने पडली. विराट केवळ 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
केएल राहुल आणि शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला पण सध्या दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये पोहोचले आहेत. एवढेच नाही तर विराट कोहलीही आऊट झाला. सध्या चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यजमान संघाच्या गोलंदाजांचा सामना करत आहेत.
तैजुल इस्लामच्या डावातील २२व्या षटकातील पहिल्या चेंडूवर यष्टिरक्षक ऋषभ पंतने चौकार ठोकला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये खेळत त्याने शॉर्ट बॉल सीमापार पाठवला. भारतीय संघाने 22 षटकात तीन गडी गमावून 55 धावा केल्या आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा 5 तर ऋषभ पंत 6 धावा करून खेळत आहे.
भारतीय संघाने 20 षटकात 3 गडी गमावून 48 धावा केल्या आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा 4 धावा करून क्रीजवर आहे, तर ऋषभ पंतचे खाते अजून उघडलेले नाही. टीम इंडियाची पहिली विकेट 41 धावांवर पडली, पण पुढच्या सात धावा करताना 3 विकेट गमावल्या. सध्या पुजारा आणि पंत यांनी मिळून मोठी भागीदारी करणे आणि संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत करणे अपेक्षित आहे.
तैजुलने आजच्या मॅचमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत दोन विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याने आतापर्यंत चार मेडन ओव्हर टाकली आहे.
भारताला मोठा धक्का, विराट कोहली अवघ्या एक धावा करून बाद झाला. विराटला तैजुल इस्लामने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने 5 चेंडूंचा सामना केला. तैजुलची ही दुसरी विकेट आहे. भारताने 48 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत.
टीम इंडिया अडचणीत 50 धावांमध्ये तीन खेळाडू बाद, चेतेश्वर पुजार आणि पंत मैदानात
भारताची तिसरी विकेट पडली, विराट कोहली आऊट
विराट कोहली आजच्या सामन्यात फक्त एक धाव काढली
भारताची दुसरी विकेट पडली. कर्णधार केएल राहुल 22 धावा करून बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज खालिद अहमदने बोल्ड केले.
मालेगाव : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात संशयितांना अटक, गावठी पिस्तूल, तीन काडतुसांसह धारदार शस्त्रे जप्त, पवारवाडी पोलिसांची कारवाई
41 धावांच्या सांघिक स्कोअरवर भारताला पहिला धक्का बसला. शुबमन गिल डावाच्या 14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर यासिर अलीच्या हाती झेलबाद झाला. गिलने 40 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आला.
इंदापूर, पुणे : खोरोची येथील वृद्ध दांपत्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात वृद्धचा मृत्यू, इंदापूर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल, पुढील तपास सुरु
भारतीय संघाने 8 षटकात एकही विकेट न गमावता 30 धावा केल्या आहेत. केएल राहुल १३ आणि शुभमन गिल १६ धावा करून खेळत आहेत.
7 ओव्हर नंतर टीम इंडियाची धावसंख्या 30
टीम इंडीयाची ओपनिंग जोडी मैदानात
केएल राहुलने इबादत हुसेनच्या सुरुवातीच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शानदार चौकार ठोकून आपले खाते उघडले. गिलने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिंगल मारून खाते उघडले. संघाने 2 षटकांत केवळ 5 धावा केल्या आहेत.
या चौकारासह राहुल त्याच्या वैयक्तिक स्कोअर 12 पर्यंत पोहोचला आहे, त्याच्यासोबत शुबमन गिल मैदानावर उपस्थित आहे, ज्याने आतापर्यंत 18 चेंडूत 7 धावा केल्या आहेत.
राहुल आणि शुभमन सलामीला उतरले
चितगाव कसोटी सामन्यात कर्णधार केएल राहुल आणि शुभमन गिल सलामीसाठी मैदानात उतरले आहेत. इबादत हुसेन डावातील पहिले षटक करेल.