Ind Vs Eng : शेवटच्या कसोटीत कुणाला संधी मिळणार? या 2 नावांची चर्चा, अशी असू शकते भारतीय प्लेईंग XI !

जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज किंवा उमेश यादव यांना शेवटच्या कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते. India Vs England 4th test

Ind Vs Eng : शेवटच्या कसोटीत कुणाला संधी मिळणार? या 2 नावांची चर्चा, अशी असू शकते भारतीय प्लेईंग XI !
India Vs England 4 Th test
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 5:03 PM

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड (india Vs England) यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात कुणाला संधी मिळेल, याची चर्चा सुरु झाली आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज किंवा उमेश यादव यांना (Mohammad Siraj or umesh yadav) शेवटच्या कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते. (India Vs England 4th test Mohammad Siraj or umesh yadav indian Playing XI Narendra Modi Cricket Stadium)

अहमदाबादस्थित नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळवण्यात येणाऱ्या सामन्यासाठी खेळपट्टी पुन्हा एकदा फिरकीला अनुकुल अशी आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटू पुन्हा एकदा जलवा दाखवण्यास सज्ज आहे. अशात संघात फारसे बदल न करता मोहम्मद सिराज किंवा उमेश यादव यांना अखेरच्या कसोटीत स्थान मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

अखेरच्या कसोटीत भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेशाच्या ध्येयाने मैदानात उतरेल. भारतीय संघाने सध्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलीय. चौथीही कसोटी काहीही करुन जिंकायची याच इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.

अक्षर आणि अश्विनची धमाकेदार कामगिरी

अक्षर आणि रविचंद्रन अश्विन यांनी आतापर्यंत मालिकेत 42 विकेट घेतल्या आहेत. अशाच बहादुर कामगिरीची अपेक्षा या दौघांकडून कर्णधार विराट कोहलीला शेवटच्या मॅचमध्ये असणार आहे.

फिरकीपटूंच्या कामगिरीकडे लक्ष

भारतीय फिरकी गोलंदाजांनी पहिल्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंडच्या 60 पैकी 49 विकेट्स घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या खेळपट्टीचा अंदाज आता सगळ्यांना आलेला आहे. त्यामुळे शेवटच्या कसोटीतही फिरकीपटूंच्या कामगिरीकडे विराटसह संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष असेल.

फलंदाजांमध्ये सातत्य नाही

भारतीय फलंदाज आतापर्यंत मालिकेत वर्चस्व राखण्यात अपयशी ठरले आहेत आणि अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात त्यांना यश आलेलं नाहीय. रोहित शर्माने आतापर्यंत मालिकेत 296 धावा केल्या आहेत. अश्विनने चेपॉकच्या कठीण पीचवर शतक झळकावलं होतं. रोहितशिवाय भारताचे फलंदाज स्पिनला साथ देणाऱ्या पीचवर आत्मविश्वासाने खेळताना दिसून येत नाहीत.

अशी असू शकते भारताची प्लेईंग XI : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, उमेश यादव

अशी असू शकते इंग्लंडची प्लेईंग XI : डॉम सिबली, जक क्रॉली, जॉनी बेयरस्टो, जो रुट, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फॉक्स, डोम बेस, जैक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन

(India Vs England 4th test Mohammad Siraj or umesh yadav indian Playing XI Narendra Modi Cricket Stadium)

हे ही वाचा :

ना कार, ना बाईक, सामनावीर क्रिकेटपटूला ‘अमूल्य’ भेट, पाच लिटर पेट्रोल बक्षीस

जिथे रुट 5 विकेट घेतो, तिथे अश्विन-अक्षरचं कौतुक कशाला, मोदी मैदानाच्या खेळपट्टीवर कारवाई करा : इंझमाम

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.