India vs England Odi | विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी आणि देवदत्तची धमाकेदार कामगिरी, इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय (India vs England ODI series 2021) मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडीक्कलला (Devdutt padikkal) संधी मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

India vs England Odi | विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी आणि देवदत्तची धमाकेदार कामगिरी, इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळणार?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय (India vs England ODI series 2021) मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडीक्कलला (Devdutt padikkal) संधी मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 5:33 PM

पुणे : नुकतीच विजय हजारे स्पर्धा (Vijay Hazare Trophy) पार पडली. मुंबईकर पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नेतृत्वात मुंबईने अंतिम सामन्यात युपीवर मात करत चौथ्यांदा विजेतेपद पटाकवलं. या स्पर्धेत 2 नावं चर्चेत राहिली. एक म्हणजे मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि (Devdutt padikkal) कर्नाटकाचा देवदत्त पडीक्कल. या दोघांनी ही स्पर्धा चांगलीच गाजवली. दोघांनी अफलातून कामगिरी केली. यासह या जोडीने इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी (India vs England ODI series 2021) आपली दावेदारी सिद्ध केली आहे. टीम इंडिया टी 20 मालिकेनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी या दोघांनी निवड समितीचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. लवकरच या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. (India vs England ODI series 2021 Prithvi Shaw and Devdutt padikkal can get chance one day series)

पृथ्वीचा दमदार ‘शो’

पृथ्वीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर संघातून डच्चू देण्यात आला. मात्र त्यानंतर त्याने आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. त्याने विजय हजारे स्पर्धेत एकूण 8 सामन्यात 165.40 च्या सरासरीने 827 धावांचा रतीब घातला. यामध्ये त्याने 3 शतक आणि 1 द्विशतक झळकावलं. विजय हजारे स्पर्धेतील एका मोसमात पृथ्वी 800 पेक्षा अधिक धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला. पृथ्वीने आपल्यातील नेतृत्वाचीही चुणूक दाखवून दिली.

पृथ्वीने साखळी फेरीत पुड्डेचरी विरुद्ध नाबाद 227 धावांची द्विशतकी खेळी केली. लिस्ट ए सामन्यात भारतीय कर्णधाराची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी केरळच्या संजू सॅमसन 2019 मध्ये गोव्या विरुद्ध 212 धावा केल्या होत्या.

देवदत्त पडीक्कलचा कारनामा

कर्नाटकाच्या देवदत्तने या हंगामात पृथ्वीनंतर सर्वाधिक धावा चोपल्या. 20 वर्षीय देवदत्तने 7 सामन्यात 147. 4 च्या सरासरीने 737 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. विशेष म्हणजे देवदत्तने हे 4 शतक सलग 4 सामन्यात लगावली. यासह देवदत्तने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटने 2008 मध्ये हजारे करंडकात असाच कारनामा केला होता.

या दोघांनी बॅटिंगने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे या दोघांनी इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली. दरम्यान देवदत्तची या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाल्यास त्याचं पदार्पण ठरेल तर पृ्थ्वीचं संघात पुनरागमन होईल. त्यामुळे या दोघांवर निवड समिती विश्वास दाखवणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

संबंधित बातम्या :

Prithvi Shaw | 3 शतक 1 द्विशतकांसह 800 धावा, कर्णधार पृथ्वीचा झंझावात, विजय हजारे ट्रॉफीत दमदार ‘शो’

Vijay Hazare Trophy 2021 | 20 वर्षीय युवा फलंदाजाचा तडाखा, सलग 4 वनडे शतकं ठोकली, संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी

IND vs ENG : टीम इंडियाचं नवं वेगवान अस्त्र, वन डे मालिकेसाठी दोन नावं जवळपास निश्चित

(India vs England ODI series 2021 Prithvi Shaw and Devdutt padikkal can get chance one day series)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.