INDvsNS : पाचवा सामना जिंकत वन डे मालिकाही भारताच्या खिशात
वेलिंग्टन : पाचवा सामना जिंकत भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांची एकदिवसीय मालिकाही 4-1 ने खिशात घातली आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्माने कर्णधारपद सांभाळलं होतं. रोहितच्या नेतृत्त्वात चौथा सामना भारतीय संघाने हातून गमावला, मात्र आज अंबाती रायुडूच्या धडाकेबाज खेळीमुळे जिंकता आला. पाचव्या सामन्यावर भारतीय संघाने 33 धावांनी विजय मिळवला. अंबाती रायुडू आणि हार्दिक पंड्या आजच्या […]
वेलिंग्टन : पाचवा सामना जिंकत भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांची एकदिवसीय मालिकाही 4-1 ने खिशात घातली आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्माने कर्णधारपद सांभाळलं होतं. रोहितच्या नेतृत्त्वात चौथा सामना भारतीय संघाने हातून गमावला, मात्र आज अंबाती रायुडूच्या धडाकेबाज खेळीमुळे जिंकता आला. पाचव्या सामन्यावर भारतीय संघाने 33 धावांनी विजय मिळवला. अंबाती रायुडू आणि हार्दिक पंड्या आजच्या सामन्याचे खरे हिरो ठरले.
भारताने न्यूझीलंडसमोर 253 धावांचं आव्हान उभं केलं होतं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत डळमळीत झाली होती. मात्र, त्यानंतर अंबाती रायुडूने दमदार खेळी करत, वैयक्तिक 90 धावसंख्या उभारली. तसेच, विजय शंकरने 45 धावा केल्या. विशेष म्हणजे, हार्दिक पंड्यानेही धडाकेबाज खेळी केली.
चौथ्या एकदिवसीय सामन्यासारखीच गत यावेळीही भारतीय संघाची झाली होती. संघातील टॉप ऑर्डर फलंदाज एकामागोमाग एक तंबूत परतले. भारताची धावसंख्या 18 वर होती, त्यावेळी चार विकेट्स गेल्या होत्या. मात्र त्यानंतर अंबाती रायुडू मैदानात आला आणि धावसंख्येचा आलेख चढता राहिला.
अंबाती रायुडू आणि विजय शंकर या दोघांनी मिळून 98 धावांची भागिदारी केली. विजय शंकरने वैयक्तिक 64 चेंडूत 45 धावा, तर अंबाती रायुडूने 113 चेंडूत 90 धावा केल्या. मात्र, विजय शंकर रन आऊट झाला आणि धावसंख्येला पुन्हा ब्रेक लागला. अंबाती रायुडूने या सामन्यात 90 धावा केल्याने, एकदिवसीय सामन्यांमधील 10 वा अर्धशतक आपल्या नावावर नोंदवला. 90 धावा केल्यानंतर रायुडू झेलबाद झाला.
केदार जाधवनेही रायुडूची चांगली साथ दिली होती. 45 चेंडूत 34 धावांची खेळी केदारने केली. तसेच, ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने स्फोटक खेळी करत 22 चेंडूत 45 धावांची नोंद केली. पाच सिक्सर आणि दोन चौकार हार्दिकने लगावले.
टॉप ऑर्डर फलंदाजांची धावसंख्या :
- रोहित शर्मा – 2 धावा
- शिखर धवन – 6 धावा
- शुभमन गिल – 7 धावा
- धोनी – 1 धाव