INDvsNZ : भारताची हॅटट्रिक, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 ने आघाडी

माऊंट मॉन्गॅनुई (न्यूझीलंड): विराट कोहलीच्या टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवत, 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी निर्णायक आघाडी घेतली. तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा 62, विराट कोहली 60, अंबाती रायुडू नाबाद 40 आणि दिनेश कार्तिकने नाबाद 38 धावा केल्या. या सामन्यात भारतासमोर 244 धावांचं लक्ष्य […]

INDvsNZ : भारताची हॅटट्रिक, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 ने आघाडी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

माऊंट मॉन्गॅनुई (न्यूझीलंड): विराट कोहलीच्या टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवत, 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी निर्णायक आघाडी घेतली. तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा 62, विराट कोहली 60, अंबाती रायुडू नाबाद 40 आणि दिनेश कार्तिकने नाबाद 38 धावा केल्या. या सामन्यात भारतासमोर 244 धावांचं लक्ष्य होतं. भारताने हे आव्हान 43 षटकात केवळ तीन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

न्यूझीलंडचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेले भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी झोकात सुरुवात केली. शिखर धवनने सुरुवातीपासूनच फटेकाबाजी केली. धवन 27 चेंडूत 6 चौकारांसह 28 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने अर्थशतक झळकावलं. रोहित आणि विराटने दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 113 धावांची भागीदारी रचली. अर्थशतकानंतर वेगवान फलंदाजीच्या नादात रोहित शर्मा 62 धावा करुन माघारी परतला. 77 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह त्याने 62 धावा केल्या. मग कोहलीनेही अर्धशतक पूर्ण केलं. कोहली 74 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 60 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी कोणतीही विकेट जाऊ न देता, टीम इंडियाचा विजयी पथाका फडकावला. न्यूझीलंडकडून बोल्टने 2 तर सँटेनरने 1 विकेट घेतली.

त्याआधी या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांनी 243 धावांत गुंडाळलं. त्यामुळे भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी 244 धावांची गरज होती. भारताच्या टिच्चून गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला 49 षटकात सर्वबाद 243 अशीच मजल मारता आली.  आधीच्या दोन्ही वन डे सामन्यात न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारल्यानंतर टीम विराट विनिंग हॅटट्रिकसाठी सज्ज झाली होती.

दरम्यान, भारताकडून आज मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 तर भुवनेश्वर, यजुवेंद्र चहल आणि आज संधी मिळालेला हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या दोन्ही सामन्यात 4-4 विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवच्या झोळीत आज एकही विकेट पडली नाही.

न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक 93 तर टॉम लॅथमने 51 धावा केल्या. टेलरचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टील आणि मुनरो यांना मोठी सलामी देता आली नाही. शमीने मुरोला 9 धावांवर बाद करुन न्यूझीलंडला पहिला धक्का देण्यात आला. त्यानंतर भुवनेश्वरने गप्टीलला 13 धावांवर माघारी धाडून भारताला दुसरं यश मिळवून दिलं. यानंतर आलेल्या केन विल्यमसनने संयमी फलंदाजी केली. त्याने 48 चेंडून 28 धावा केल्या असताना, हार्दिक पांड्याने जबरदस्त झेल टिपून त्याला बाद केलं.

यानंतर ठराविक वेळाने न्यूझीलंडचे फलंदाज तंबूत परतत गेल्याने, त्यांचा डाव 243 धावांत आटोपला.

आजच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली. गोलंदाज विजय शंकरलाही वगळण्यात आले. या दोघांच्या जागी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याचा समावेश करण्यात आला होता.

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल

न्यूझीलंड संघ : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, कॉलिन मन्रो, रॉस टेलर, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), हेन्री निकोलस, मिचेल सँटनर, डो ब्रेसवेल, इश सोढी, लॉकी फर्गुसन, ट्रेन्ट बोल्ट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.