बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा संसाराचा नवा डाव मांडणार; लवकरच करणार दुसरे लग्न!

विष्णू विशाल हा तामिळ अभिनेता आणि निर्माता आहे. | Jwala Gutta Vishnu Vishal

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा संसाराचा नवा डाव मांडणार; लवकरच करणार दुसरे लग्न!
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 3:18 PM

मुंबई: भारताची आघाडी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (ज्वाला गुट्टा) लवकरच संसाराचा नवा डाव मांडणार आहे. बॉलीवूड अभिनेता विष्णू विशाल (Vishnu Vishal) याच्यासोबत ती लग्न करणार आहे. बॉलीवूडच्या आगामी ‘अरण्य’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात विष्णू विशाल याने तो आणि ज्वाला लग्न करणार असल्याचे सांगितले. ज्वालाने आतापर्यंत माझ्यावर निस्पृह वृत्तीने प्रेम केले. त्यासाठी मी तिचा ऋणी असल्याचे विष्णू विशालने म्हटले. (Vishnu Vishal and Jwala Gutta to tie the knot soon confirms actor)

यापूर्वी 2005 साली ज्वाला गुट्टा हिने बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी लग्न केले होते. मात्र, दोघांमधील वादामुळे हे नाते फारकाळ टिकू शकले नव्हते. ज्वाला आणि चेतन आनंद 2011 मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले होते. त्यानंतर आता ज्वाला दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. विष्णू विशाल हादेखील घटस्फोटित आहे. 2011मध्ये त्याने रजनी नटराजनशी लग्न केले होते, परंतु 2018मध्ये या दोघांनी काडीमोड घेतला होता.

ज्वाला आणि विष्णू विशालची लव्हस्टोरी

विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर या दोघांचे फोटोही चर्चेचा विषय ठरत होता. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात विष्णू विशाल आणि ज्वालाने साखरपुडा केला होता. तेव्हापासून या दोघांचे लग्न कधी होणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती.

कोण आहे विष्णू विशाल?

विष्णू विशाल हा तामिळ अभिनेता आणि निर्माता आहे. त्याचा अरण्य हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या 26 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात विष्णू विशाल हा एका माहुताची भूमिका साकारत आहे.चित्रपटसृष्टी येण्यापूर्वी विष्णू विशाल याने क्रिकेटमध्येही नशीब आजमावून पाहिले होते. मात्र, पायाच्या दुखापतीमुळे त्याने हे क्षेत्र सोडले होते. त्यानंतर 2009 मध्ये विष्णू विशालने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

हेही वाचा :

Video | वीणा नाही, तर शिव ठाकरेचा ‘या’ अभिनेत्रीसोबत रोमान्स, रोमँटिक अंदाजात दिसली जोडी!

Rashmika Mandanna | रश्मिकाच्या नव्या लूकवर चाहते झाले फिदा, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!

(Vishnu Vishal and Jwala Gutta to tie the knot soon confirms actor)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.