2014 चा आणि आताचा कोहली, यामध्ये फरक काय?, रवी शास्त्रींचं मजेदार उत्तर पण विराटलाही हसू अनावर!
शास्त्रींनी विराट कोहलीची तारीफ तर केलीच पण त्यांच्या बोलण्यात विराटबद्दल दृढविश्वास होता. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा उल्लेख रवी शास्त्री यांनी आवर्जून केला. (Indian Cricket Team Ravi Shastri statement On Virat Kohli From 2014 and today)
मुंबई : भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) तीन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) रवाना झाली आहे. त्यापूर्वी टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मीडियाशी बातचीत केली. यादरम्यान विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी पत्रकारांच्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली. विराटवरच्या एक प्रश्नाला उत्तर देताना रवी शास्त्री यांचा मजेदार अंदाज दिसून आला. खरं तर प्रश्न विराट कोहलीसाठी होता पण रवी शास्त्री यांना घाई घाईत मी उत्तर देतो असं म्हणत मजेदार अंदाजात उत्तर दिलं. (Indian Cricket Team Coach Ravi Shastri statement On Virat Kohli From 2014 and today)
रवी शास्त्रींचा मजेदार अंदाज
भारतीय संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याच पत्रकार परिषदेत 2014 सालचा विराट कोहली आणि आताचा इंग्लंड दौऱ्यावर जाणारा विराट कोहली यांच्यात नेमका काय फरक आहे? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाला उत्तर देताना रवी शास्त्री यांचा मजेदार अंदाज पाहायला मिळाला…
विराटला हसू अनावर
शास्त्री म्हणाले, “या प्रश्नाचे उत्तर मी देतो. 2014 सालचा विराट आणि आताचा विराट यातला फरत सांगायचा झाला तर तो दरम्यानच्या काळात चांगलाच फिट्ट झालाय. (त्याने तब्येत कमी केलीय). कोहली सध्या टीमचा कर्णधार आहे आणि आतापर्यंतच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत केवळ साडे पाच हजार रन्स केलेत…”, असं म्हणत त्यांनी विराट कोहलीची मजा घेतली. साहजिक शेजारी बसलेल्या विराटला देखील असू अनावर झालं.
शास्त्रींनी विराट कोहलीची तारीफ तर केलीच पण त्यांच्या बोलण्यात विराटबद्दल दृढविश्वास होता. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा उल्लेख रवी शास्त्री यांनी आवर्जून केला. तसंच त्याच्या रन्सचा उल्लेख करुन इंग्लंड दौऱ्यावर रन्स करण्यासाठी कोहलीला शुभेच्छा दिल्या.
Ravi Shastri gives an honest answer on the differences between 2014 Kohli and now ?#WTC21 pic.twitter.com/5erqOqoa87
— ICC (@ICC) June 2, 2021
विराट आणि रवी शास्त्री यांची Audio क्लिप व्हायरल
पत्रकार परिषदेत विराट आणि रवी शास्त्री यांच्यातल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यात खेळाविषयीच्या काहीतरी गुजगोष्टी सुरु होत्या. मात्र त्यांच्या लक्षातच आलं नाही की आपण लाईव्ह आहोत. या संवादात विराट टीम इंडियाच्या बोलिंग अॅटॅकवर बोलतोय. ‘हम इनको राऊंड द विकेट डालेंगे, लाला सिराज इनको शुरु से ही लगा देंगे’, त्यावर विराटच्या मताला सहमती दर्शवत, ‘हम्म, बराबर…’ असं रवी शास्त्री म्हणतात…
Best part about PC was at start, when Kohli and Ravi didn’t knew they were live, they were discussing ongoing ENGvNZ match.
Kohli was saying something- ‘hum inko round the wicket dalwayenge, Left handers hai inpe, Lala Siraj sabko start se hi laga denge.’ Shastri nodded “hmm” https://t.co/iNHZtZNQ44
— Andy (@WeBleedBlue007) June 2, 2021
(Indian Cricket Team Coach Ravi Shastri statement On Virat Kohli From 2014 and today)
हे ही वाचा :