Video : भर मैदानात प्रेक्षक ओरडू लागले, ‘एक रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेXX’!

दोन प्रतिस्पर्ध्यांदरम्यान रंगलेली उत्कंठावर्धक मॅच... दोन्ही संघादरम्यान जिंकण्याची चुरस... मैदानात प्रेक्षकांची ओसांडून वाहणारी गर्दी, आपापल्या प्लेअर्सला, संघांना प्रेक्षकांनी केलेलं चिअरअप, हे सगळं खेळाडू मिस करतायत.

Video : भर मैदानात प्रेक्षक ओरडू लागले, 'एक रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेXX'!
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 5:42 PM

मुंबई : दोन प्रतिस्पर्ध्यांदरम्यान रंगलेली उत्कंठावर्धक मॅच… दोन्ही संघादरम्यान जिंकण्याची चुरस… मैदानात प्रेक्षकांची ओसांडून वाहणारी गर्दी, आपापल्या प्लेअर्सला, संघांना प्रेक्षकांनी केलेलं चिअरअप, हे सगळं खेळाडू मिस करतायत. जवळपास गेले वर्षभर मैदानावरील खेळ पाहायला प्रेक्षकांना परवानगी नाहीय. मैदानावर खेळाडूंना प्रेक्षकांविना खेळावं लागतंय. साहजिक प्रेक्षक नसल्याने खेळाडूंनाही थोडं चुकल्या सारखं वाटतंय. सध्या आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करण्यात आलाय. सगळे खेळाडू आपापल्या घरी आहेत. सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. काही आठवणी, फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत. भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्रेक्षकांचं अनोखं चिअरअप बघायला आणि ऐकायला मिळत आहे. (Indian Player Shreyas Iyer Share A Funny Video On Insta Video Goes Viral On Social Media)

श्रेयस अय्यरकडून मजेशीर व्हिडीओ शेअर

श्रेयस अय्यरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाठीमागील वर्षातील डिसेंबर महिन्यातील आहे जेव्हा भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यांत श्रेयस अय्यर बाऊन्ड्री लाईनला फिल्डिंग करत असताना प्रेक्षक मजेदार अंदाजात त्याला पाठिंबा देत होते.

मैदानात प्रेक्षकांचा आवाज, ‘एक रुपये की पेप्सी, अय्यर भाई XXX’!

श्रेयस अय्यर बाऊन्ड्री लाईनला फिल्डिंग करत होता. यावेळी श्रेयसच्या पाठीमागे म्हणजेच अगदी सीमारेषेपलीकडे काही प्रेक्षकांचा ग्रुप बसला होता. हा ग्रुप मोठमोठ्याने आवाज करत होता, ‘एक रुपये की पेप्सी, अय्यर भाई XX…’!

View this post on Instagram

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

हाच व्हिडीओ श्रेयस अय्यरने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. माझ्या आवडीचा Chant मी शोधलाय. मी आता पुनरागमनासाठी अधिक वेळ वाट पाहू शकत नाही, असं श्रेयसने म्हटलंय.

श्रीलंका दौऱ्यात श्रेयसच्या हाती भारताची धुरा?

टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) काही दिवसांपू्र्वी दिली. टीम इंडियाची बी टीम या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध प्रत्येकी 3 वनडे आणि टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच वेळेस टीम इंडियाचा मुख्य संघ हा इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे सगळे अनुभवी खेळाडू इंग्लंडमध्ये असल्याने भारताची ताज्या दमाची टीम श्रीलंकेत खेळणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत भारताचं नेतृत्व कुणाकडे असणार यावरुन बरीच चर्चा रंगतीय. यामध्ये श्रेयसकडे भारताची धुरा देण्याची दाट शक्यता आहे.

(Indian Player Shreyas Iyer Share A Funny Video On Insta Video Goes Viral On Social Media)

हे ही वाचा :

WTC 2021 : काही दिवस पाणी द्यायला, बेंचवर बसायला ठीक आहे, पण आता बस्स, कुलदीप यादव हळहळला

आयपीएलमध्ये झालेली ‘ही’ चूक BCCI पुन्हा करणार नाही, उचललं कठोर पाऊल

क्रिकेटच्या मैदानात असतानाच वडिलांच्या निधनाची बातमी कळाली, आता म्हणतो, ‘विराट भैय्याचे माझ्यावर उपकार’

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.