सानिया मिर्झा हिचा एक्स पती शोएब मलिक याने केली अत्यंत मोठी घोषणा, शोएब मलिक आता..
सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सानिया मिर्झाच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. सानिया मिर्झा हिचा काही दिवसांपूर्वीच शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झालाय. हेच नाही तर सानिया मिर्झाच्या घटस्फोटानंतर शोएबने दुसरे लग्न देखील केले आहे.
भारतीय क्रिकेट संघ टी 20 विश्वचषकात सातत्याने सामने जिंकताना दिसतोय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. 20 जून रोजी झालेल्या सुपर 8 मधील पहिला सामना देखील जिंकला आहे. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव केलाय. भारतीय क्रिकेट संघावर काैतुकांचा वर्षाव होताना दिसतोय. दुसरीकडे पाकिस्तानी चाहते हे टी 20 विश्वचषकातून लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघावर टीका करताना दिसत आहेत. अमेरिका (USA) संघाकडून पाकिस्तानचा पराभव झाल्याने चाहत्यांना ते जास्तच जिवारी लागलंय.
हे सर्वकाही सुरू असतानाच आता भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा एक्स पती आणि पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शोएब मलिक याने अत्यंत मोठे भाष्य केले आहे. हेच नाही तर शोएब मलिक याने मोठी घोषणा केलीये. आता शोएब मलिक याने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. शोएब मलिक मैदानात उतरण्यास तयार आहे.
शोएब मलिक म्हणाला की, मला पुन्हा पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. मला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळायचे आहे. मी माझ्या देशासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मला फक्त पाकिस्तानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आहे. थोडक्यात काय तर पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शोएब मलिक याने खेळण्याची इच्छा जाहीर केलीये.
टी 20 विश्वचषकात पाकिस्तान संघाची कामगिरी अजिबातच चांगली झाली नाहीये. यामुळे संघावर जोरदार टीका होताना दिसतंय. दुसरीकडे शोएब मलिक हा गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी संघातून बाहेर आहे. आता परत एकदा संघात पुनरागमन करण्याची थेट इच्छा शोएब मलिक याने व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी संघातून जरी बाहेर असला तरीही 42 वर्षाच्या शोएब मलिक याने अद्याप निवृत्त घेतलेली नाहीये. शोएब मलिक याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. तेंव्हापासून तो पाकिस्तानी क्रिकेट संघातून बाहेरच आहे. आता शोएब मलिक याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
शोएब मलिक गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शोएब मलिक याने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत लग्न केले. शोएब मलिक याने थेट सोशल मीडियावर आपल्या दुसऱ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. यानंतर लोक सोशल मीडियावर शोएब मलिक याला खडेबोल सुनावताना दिसले.