इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाच्या या खेळाडूने म्हटलं, ‘मला झोप येत नाही!’

स्मृती मंधाना म्हणते, "प्रत्येक दौर्‍यावर झोप येते, पण इंग्लंडमधल्या वेळेचं गणित मला आवडतं. इंग्लंडची वेळ भारताच्या मागे असल्याने मला हे सूट करतं.." Indian Women Cricketer Smriti Mandhana says I can't sleep in England

इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाच्या या खेळाडूने म्हटलं, 'मला झोप येत नाही!'
स्मृती मंधाना
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 9:15 AM

मुंबई : टीम इंडियाचे (Team India) सगळे खेळाडू इंग्लंडमध्ये (India Tour of England) पोहोचले आहेत. भारतीय पुरुष आणि महिलांचा संघध यंदाच्या साली एकत्रितरित्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. इंग्लंडमध्ये दोन्हीही संघाना मोठं मिशन पार पाडायचं आहे. सध्या दोन्ही संघ क्वारंटाईन आहेत. संघांना मैदानात येण्यास आणि त्यांचा खेळ दाखवण्यास आणखी काही दिवसांची प्रतिक्षा आहे. पण, आतापासूनच खेळाडूंमध्ये विजयी संचार सुरु झालेला आहे. भारतीय महिला संघाच्या खेळाडूची तर चक्क झोप उडाली आहे. महिला संघाची धडाकेबाज खेळाडू स्मृती मंधानाची (Smriti mandhana) मात्र एक तक्रार आहे. ती म्हणते, बाकीच्या दौऱ्यांवर ठीक आहे, परंतु जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर येण्याची वेळ येते तेव्हा पूर्ण झोप लागत नाही. सकाळी सकाळी खूप लवकर जाग येते. (Indian Women Cricketer Smriti Mandhana says I can’t sleep in England)

स्मृती मंधाना म्हणते, प्रत्येक दौर्‍यावर झोप येते, पण इंग्लंडमधल्या वेळेचं गणित मला आवडतं. इंग्लंडची वेळ भारताच्या मागे असल्याने मला हे सूट करतं कारण, मी लवकर झोपू शकते आणि सकाळी 5:30 किंवा 6 वाजता उठू शकते. स्मृतीने आपल्या टीममधील खेळडू जेमिमा रॉड्रिग्जबरोबरच्या व्हिडिओ चॅटमध्ये या गोष्टी सांगितल्या.

इंग्लंड दौऱ्यासाठी स्मृती सज्ज

भारताकडून 2 कसोटी सामने खेळलेली डावखुरी स्मृतीने सांगितले म्हणते, इंग्लंडच्या या दौऱ्याबद्दल ती खूपच उत्साही आहे. “मला वाटतं की हा एक अतिशय रोमांचक दौरा आहे कारण भारतीय महिला संघ कसोटीसाठी बर्‍याच दिवसांनी दौरा करीत आहे. टी 20 लीगसाठी आम्ही बरेच दौरे केले आहेत पण बर्‍याच दिवसांनंतर संपूर्ण टीमसह दौर्‍यावर जाणं ही फिलिंग खूपच चांगली आहे.”, असं स्मृती म्हणाली.

स्मृतीची आतापर्यंतची क्रिकेट कारकीर्द

स्मृतीने दोन कसोटी सामन्यांत 81 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तिने आपल्या बॅटिंगने एक वेगळी छाप सोडली आहे. स्मृतीने 56 एकदिवसीय सामन्यात 2172 धावा केल्या आहेत, तर 78 टी -20 सामन्यात तिच्या बॅटमधून 1782 धावा आल्या आहेत.

असा असेल इंग्लंडचा दौरा

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात एकूण सात सामने खेळवले जातील. ज्यातील पहिला कसोटी सामना  16 जून रोजी ब्रिस्टॉल येथे खेळवला जाईल. त्यानंतर पहिला एकदिवसीय सामना ही ब्रिस्टॉल येथेच खेळवला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना 30 जूनला टॉन्टनमध्ये खेळवण्यात आणि अखेरचा एकदिवसीय सामना वॉरेस्टरमध्ये पार पडणार आहे. एकदिवसीय सामन्यांनंतर टी-20 मालिकेला 9 जुलैला सुरुवात होईल. ज्यात पहिला सामना नॉर्थेम्प्टन, दुसरा सामना 11 जुलैला ब्रिगटॉन येथे खेळवला जाईल. दौऱ्यातील अखेरचा सामना चेम्सफोर्ड येथे 14 जुलैला खेळवण्यात येईल.

(Indian Women Cricketer Smriti Mandhana says I can’t sleep in England)

हे ही वाचा :

डेवॉन कॉनवेने 125 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला, इंग्लंडमध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू!

तो आला, त्याने इंग्लंडला झोडलं, पदार्पणात लॉर्ड्सवर षटकाराने दुहेरी शतक ठोकलं, कॉनवेचा वर्ल्ड रेकॉर्ड!

भारतीय गोलंदाजाच्या वडिलांचं निधन, रवी शास्त्री म्हणाले वडिलांचा आशीर्वाद तुझ्यासोबत, तुला 5 विकेट्स मिळतील

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.