IPL 2020 : गोलंदाजाच्या चुकीनंतर कॅप्टन कूल धोनी मैदानावरच भडकला!
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या मैदानावरील शांत स्वभावामुळे परीचित आहे. परंतु काल सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात लोकांना धोनीचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला.
दुबई : चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या मैदानावरील शांत स्वभावामुळे परीचित आहे. परंतु काल (मंगळवारी) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात लोकांना धोनीचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. या सामन्यावेळी लोकांना पहिल्यांदाच रागावलेला धोनी पाहायला मिळाला. (IPL 2020 | CSKvSRH : Angry MS Dhoni shouted from behind the wicket due to bowlers mistake)
चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगलेच जखडून ठेवले होते. परंतु काही वेळा असे वाटत होते की, हा सामना चेन्नईच्या हातून निसटू शकतो. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत चेन्नईला हा सामना जिंकणे गरजेचे होते. त्याचा दबाव धोनीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यामुळेच धोनी मैदानावर नेहमीप्रमाणे शांत दिसत नव्हता.
धोनीने या सामन्यात कधी पंचांवर नाराजी व्यक्त केली तर कधी गोलंदाजांवर भडकला. 168 धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादच्या संघाने 5 विकेट्सच्या बदल्यात 122 धावा केल्या होत्या. कर्ण शर्मा गोलंदाजी करत असताना समोर केन विलियमसन फलंदाजी करत होता. हैदराबादच्या संघाला जिंकण्यासाठी तीन षटकांमध्ये 46 धावांची आवश्यकता होती. त्याचदरम्यान शर्माने एक शॉर्ट बॉल टाकला. विलियमसनने त्यावर एक शानदार चौकार फटकावला.
पुढच्या चेंडूवर शर्माने विलियमसनला बाद केले. परंतु त्यापुढच्या चार चेंडूंवर हैदराबादच्या फलंदाजांनी दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. त्यावेळी कॅप्टन कूल कर्ण शर्मावर चिडला होता. धोनी सातत्याने शर्माला काहीतरी सांगत होता. त्यानंतर शर्माच्या पुढच्या षटकात हैदराबादच्या नदीमने चांगले फटके लगावले. यष्टीमागे उभा असलेला धोनी शर्माला वेगवेगळ्या सूचना करत होता. परंतु शर्माकडून धोनीच्या मनासारखी गोलंदाजी होत नव्हती. एक क्षण असा आला जेव्हा धोनी थेट शर्माच्या जवळ गेला आणि त्याच्यावर ओरडला. त्याला सांगितलं की इथे नको तिथे गोलंदाजी कर.
#IPL2020 A day when #MSDhoni was pretty animated pic.twitter.com/8zF3dF4F7H
— Aditya Bhattacharya (@aditya_bh16) October 14, 2020
दरम्यान, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 20 धावांनी मात केली. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 षटकांमध्ये 8 विकेट गमावून 147 धावाच करता आल्या. हैदराबादकडून केन विलियम्सने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर जॉनी बेयरस्टोने 23 धावांची खेळी केली. मात्र त्यांना हैदराबादला विजयी आकड्यापर्यंत पोहचवता आले नाही. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2 बळी घेतले. तर सॅम करन, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर या तिकडीने प्रत्येकी 1 बळी घेतला.
संबंधित बातम्या
IPL 2020, CSK vs SRH : कॅप्टन कूलचा संयम सुटला, महेंद्रसिंह धोनी भरमैदानात अंपायरवर भडकला
IPL 2020, SRH vs CSK : चेन्नई सुपर किंग्जसची सनरायजर्स हैदराबादवर 20 धावांनी मात
(IPL 2020 | CSKvSRH : Angry MS Dhoni shouted from behind the wicket due to bowlers mistake)