IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; ‘या’ खेळाडूंवर फोडलं खापर

आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्जसचा 37 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील चेन्नईचा हा पचवा पराभव आहे.

IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; 'या' खेळाडूंवर फोडलं खापर
एम एस धोनी
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 9:04 AM

दुबई : इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) चेन्नई सुपर किंग्जसचा (Chennai Super Kings) 37 धावांनी पराभव केला. बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून अवघ्या 132 धावाच करता आल्या. (IPL 2020 : MS Dhoni slams Batsman of CSK after fifth defeat)

या सामन्यात चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि नारायण जगदीशनचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. चेन्नईकडून अंबाती रायुडूने सर्वाधिक 42 तर नारायण जगदीशनने 33 धावा केल्या. तसेच या सामन्यात धोनीने पुन्हा निराशा केली. धोनी 10 धावांवर बाद झाला. बंगळुरुच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी चेन्नईच्या रायुडूवगळता एकाही फलंदाजाला डोकं वर काढू दिलं नाही. या सामन्यातील पराभवामुळे चेन्नईचा कर्णधार खूप निराश झाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये धोनीने त्याची निराशा व्यक्त केली.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नईचा संघ काल पाचव्यांदा पराभूत झाला. कर्णधार धोनीने संघाच्या या खराब कामगिरीचं खापर चेन्नईच्या फलंदाजांवर फोडलं, तसेच गोलंदाजांच्या कामगिरीबाबत धोनीने निराशा व्यक्त केली. धोनी म्हणाला की, गोलंदाजी करत असताना आम्ही शेवटच्या चार षटकांमध्ये चांगली कामगिरी केली नाही.

फलंदाजांबाबत बोलताना धोनी म्हणाला की, आमच्या फलंदाजांनी चांगला खेळ करण्याची आवश्यकता होती. फलंदाजी आमचा चिंतेचा विषय आहे. आजच्या सामन्यात ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली. संघाच्या फलंदाजीबाबत आम्हाला काहीतरी करावं लागणार आहे.

धोनी म्हणाला की, आम्हाला वेगळ्या पद्धतीने खेळावं लागणार आहे. आम्ही मोठे फटके मारायला हवे होते, भले आम्ही बाद झालो असतो तरी चाललं असतं. परंतु आम्ही आक्रमकपणे फलंदाजी करायला हवी होती. पुढील सामन्यात आम्ही तसा प्रयत्न करु. सहाव्या षटकानंतर आमच्या फलंदाजांची गती कमी होते. आमचा खेळ पाहताना असं जाणवतं की, आम्ही कोणत्याही रणनीतिसह मैदानात उतरलेलो नाही. आमच्या संघात अनेक कमतरता आहेत.

संबंधित बातम्या

IPL 2020 | हिंमत असेल तर माझ्यापेक्षा चांगलं खेळून दाखव, हिटमॅन रोहितचं गब्बर धवनला आव्हान

IPL 2020, KXIP vs KKR : वेगवान अर्धशतकासह कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नावे अनोख्या कामगिरीची नोंद

(IPL 2020 : MS Dhoni slams Batsman of CSK after fifth defeat)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.