IPL 2020 | ईशान किशन भारतीय संघात धोनीची विकेटकीपरची जागा घेण्यासाठी सज्ज : एम एस के प्रसाद

ईशानने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 14 सामन्यात 516 धावा केल्या.

IPL 2020 | ईशान किशन भारतीय संघात धोनीची विकेटकीपरची जागा घेण्यासाठी सज्ज : एम एस के प्रसाद
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 3:52 PM

मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians)आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals)पराभव केला. यासह मुंबईने पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. मुंबईच्या या विजयात सर्वच खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. मात्र इशान किशनने (Ishan Kishan) यावेळेस उठावदार कामगिरी केली. इशानने अंतिम सामन्यात 33 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. ईशान टीम इंडियामध्ये महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) जागा घेण्यास तयार आहे, असा दावा निवड समितीचे माजी अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी केला आहे. ipl 2020 mumbai indians ishan kishan ready to replace dhoni as wicketkeeper in indian team said ex bcci chief selector msk prasad

एम एस के प्रसाद काय म्हणाले?

“आयपीएलच्या 13 व्या मोसमात ईशानने धमाकेदार खेळी केली. हे पाहून फार चांगलं वाटलं. ईशानसाठी आयपीएलचं 13 वं पर्व चांगलं राहिलं. इशानने सलामीला तसेच चौथ्या क्रमांकावरही चांगली भूमिका वटवली. ईशानमध्ये परिस्थितीनुसार गिअर बदलण्याची क्षमता आहे. त्याच्या या क्षमतेमुळेच तो टीम इंडियाच्या विकेटकीपर बॅट्समन पदाचा प्रमुख दावेदार आहे. जर तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतो आणि फलंदाजी करतो तर टीम इंडियामध्ये त्याचे स्वागत केले पाहिजे”, असं एमएसके प्रसाद टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले.

मुंबई इंडियन्सने 2018 मध्ये ईशान किशनला आपल्या ताफ्यात समाविष्ठ केलं होतं. तेव्हा इशानसाठी 6.2 कोटी रक्कम मोजली होती. ईशानने आयपीएलच्या या 13 व्या मोसमात तडाखेदार कामगिरी केली. ईशानने या मोसमात एकूण 14 सामन्यात 516 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 अर्धशतकं लगावली. 99 ही त्याची या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. ईशान या मोसमात सर्वाधिक सिक्सर खेचणारा फलंदाज ठरला. ईशानने या मोसमात एकूण 30 सिक्स लगावले.

जागा एक, स्पर्धक अनेक

टीम इंडियाचा वर्ल्ड कप 2019 मध्ये उपांत्य सामन्यात न्यूझीलंडशी गाठ पडली. या सामन्यात भारताचा पराभव झाला. यानंतर महेंद्र सिंह धोनी संघापासून दूर होता. धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीमुळे संघातील विकेटकीपर पदाची जागा रिकामी झाली. धोनीच्या जागेवर ऋषभ पंतला वारंवार संधी दिली. मात्र पंतला त्या संधीचं सोनं करता आलं नाही.

आयपीएल स्पर्धेतून धोनीच्या विकेटकींपगचा वारसदार मिळणार, या नजरेने पाहण्यात आलं. धोनीची विकेटकीपरची जागा मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली. यामध्ये ऋषभ पंत, केएल राहुल, ऋद्धीमान साहा आणि संजू सॅमसन यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. या सर्व यष्टीरक्षक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मात्र आता एम एस के प्रसाद यांनी ईशानबद्दल महत्वपूर्ण विधान केलंय. तसेच इशाननेही धमाकेदार कामगिरी केलीय. त्यामुळे या स्पर्धेत ईशाननेही आपली दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे धोनीची जागा मिळवण्यात कोण यशस्वी ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

MS Dhoni Retirement | महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, आयपीएलमध्ये खेळणार

IPL 2020 : ‘सिक्सर किंग’ ख्रिस गेलला न जमलेला रेकॉर्ड मुंबई इंडियन्सच्या इशान किशनच्या नावे

ipl 2020 mumbai indians ishan kishan ready to replace dhoni as wicketkeeper in indian team said ex bcci chief selector msk prasad

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.