AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | प्रेमाच्या पिचवर पृथ्वी शॉची विकेट, अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा

पृथ्वी शॉ अभिनेत्री प्राची सिंगसोबत डेटिंग करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

IPL 2020 | प्रेमाच्या पिचवर पृथ्वी शॉची विकेट, अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा
Follow us
| Updated on: Sep 10, 2020 | 5:58 PM

दुबई : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ आयपीएलमधून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सदस्य असलेला पृथ्वी 20 सप्टेंबरला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना खेळेल. मात्र सध्या यूएईमध्ये असलेला शॉ वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे. (IPL 2020 Prithvi Shaw Instagram posts spark dating rumors with actress Prachi Singh)

पृथ्वी शॉ यूएईमध्ये आयपीएलची तयारी करत आहे. शिखर धवनसह तो सलामीला मैदानात उतरेल. बहुप्रतिक्षित पुनरागमनानंतर धवनसोबत त्याची जोडी मैदानावर कशी जमणार, यापेक्षा पृथ्वी शॉची अभिनेत्री प्राची सिंगसोबत जोडी जुळणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

पृथ्वी शॉच्या इन्स्टाग्राम पोस्टवर प्राची सिंगने केलेल्या कमेंटमुळे चाहत्यांचे डोळे विस्फारले आहेत. पृथ्वी शॉच्या काही पोस्टवर तिने केलेल्या कमेंट्समुळे दोघांमध्ये काही शिजत असल्याच्या चर्चा फेर धरु लागल्या आहेत.

क्रिकेटपटू अक्षर पटेलसोबत पृथ्वीने शेअर केलेल्या एका फोटोवर ‘मी हे खळाळतं हास्य मिस करत आहे’ अशी कमेंट प्राचीने केली आहे, तर एका फोटोवर तिने चक्क ‘क्युटी’ अशी कॉम्प्लीमेंट पृथ्वीला दिली आहे. यावर तोसुद्धा हार्ट इमोजी टाकून आभार मानताना दिसतो.

प्राची सिंह ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘उडान’ या मालिकेत भूमिका साकारली आहे. मुंबईत राहत असल्याने दोघांचे सूर जुळल्याचे बोलले जाते. पृथ्वी शॉ 18 वर्षांचा आहे.

IPL 2020 Prithvi Shaw Instagram posts spark dating rumors with actress Prachi Singh
View this post on Instagram

Challenge accepted! @shinydixit05 @sheetal_saraswati . . . . . . . #blackandwhite #bnwchallenge #portrait #womenempoweringwomen #instagood

A post shared by Prachi Singh (@prachisingh2202) on

2018 च्या अंडर 19 विश्वचषकात विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या पृथ्वी शॉने त्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तो घरच्या मैदानावर खेळत होता, पण दुखापत आणि बीसीसीआयच्या बंदीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून त्याला दूर रहावे लागले. शॉने बंदीची मुदत पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आणि आतापर्यंत त्याने चार कसोटी सामने खेळले आहेत.

आयपीएलमध्ये त्याने 25 सामन्यांत 598 धावा केल्या आहेत. 2018 मध्ये दिल्ली संघात सहभागी झालेला पृथ्वी आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीममध्ये तिसऱ्या वर्षी खेळण्यास उत्सुक आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत पृथ्वी शॉ अखेरचा सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नियोजित मालिकेत तो सलामीला उतरणार होता, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका पुढे ढकलली गेली. क्रिकेटपटूंना जवळपास सहा महिने खेळापासून दूर राहावे लागले होते, मात्र आयपीएल 2020 च्या माध्यमातून क्रिकेटपटू आणि चाहते अशा सर्वांची उत्सुकता शमणार आहे. (IPL 2020 Prithvi Shaw Instagram posts spark dating rumors with actress Prachi Singh)

..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.