VIDEO : दिल्लीच्या कर्णधारपदी नियुक्त झाल्यानंतर रिषभ पंतचा पहिला व्हिडीओ समोर

दिल्लीच्या कर्णधारपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच रिषभ पंतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे (Rishabh Pant share video of workout)

VIDEO : दिल्लीच्या कर्णधारपदी नियुक्त झाल्यानंतर रिषभ पंतचा पहिला व्हिडीओ समोर
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 4:51 PM

नवी दिल्ली : दिल्लीच्या कर्णधारपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच रिषभ पंतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो प्रचंड मेहनत करताना दिसत आहे. आयपीएलच्या आगामी मोसमासाठी स्वत:ला फिट करत असल्याचं रिषभने म्हटलं आहे. त्याचा हा नवा व्हिडीओ अनेकांना आवडत आहे. अनेकजण त्याची कर्णधारपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत (Rishabh Pant share video of workout).

व्हिडीओत नेमकं काय?

व्हिडीओत रिषभ पंत वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सर्साईजचे प्रकार करताना दिसतोय. यामध्ये रनिंग, डंबल उचलणं, स्ट्रेचिंग यांचा समावेश आहे. व्यायाम करताना तो प्रचंड घामाघूम झालेलाही दिसत आहे. या व्हिडीओला त्याने कॅप्शनही दिलं आहे. “मी स्वत:ला पुन्हा एकदा फिट करतोय. मी आता दिल्ली कॅपिटल्सची जर्सी घालण्यासाठी उत्सुक आहे”, असं त्याने कॅप्शमध्ये म्हटलं आहे (Rishabh Pant share video of workout).

View this post on Instagram

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने रिषभ पंतवर जबाबदारी

इंग्लंडविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा दिग्गज खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला एकदिवसीय सीरिजमधून बाहेर पडावं लागलं होतं. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला आयपीएलच्या आगामी मोसमात खेळता येणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व रिषभ पंतच्या खांद्यावर सोपवण्यात आलं आहे.

इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकांत श्रेयसला दुखापत झाली. शार्दूल ठाकूरच्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर एक वेगवान बॉल रोखण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खांदा दुखावला गेला. दुखापत गंभीर असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.

रिषभ पंतची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी

रिषभ पंत 2016 सालापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. आतापर्यंत 2018 चं सीझन त्याच्यासाठी खास ठरलं. त्या सीझनमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 684 धावा केल्या होत्या. गेल्या सीझनमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 343 धावा केल्या होत्या. रिषभने आतापर्यंत 68 सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 2079 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

येत्या 9 एप्रिलपासून आयपीएल

आयपीएलच्या आगामी मोसमाला येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पहिला आणि सलामीचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अनेक खेळाडू आपापल्या टीमसोबत जुळले गेले आहेत. अनेक जण सध्या क्वारंटाईन आहेत.

हेही वाचा : IPL इतिहासातली युवा कर्णधारांची संपूर्ण लिस्ट, रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.