IPL 2022 : पडद्यामागील खऱ्या हिरोंसाठी बीसीसीआयकडून मोठी घोषणा, 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस

आयपीएल स्पर्धेत सर्वच मैदानांवर अतिशय रंगतदार सामने पाहायला मिळाले. या सिझनमधील 74 सामन्यांसाठी खेळपट्टी आणि मैदान उत्तमरित्या तयार करणाऱ्या क्यूरेटर्सना बीसीआयकडून 1.25 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय.

IPL 2022 : पडद्यामागील खऱ्या हिरोंसाठी बीसीसीआयकडून मोठी घोषणा, 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस
IPLImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 10:47 PM

मुंबई : दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर इंडियन प्रीमियन लीगचा (Indian premier league) संपूर्ण हंगाम भारतात आयोजित करण्यात आलाय. 26 मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल 2022 (IPL 2022) ची फायनल एका जबरदस्त अंदाजात झाली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे आयपीएल स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. मागील वर्षी बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India) भारतात आयपीएलचं आयोजन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मध्येच स्पर्धा रोखण्यात आली. यंदा मात्र बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा भारतात यशस्वीरित्या पार पाडली आहे. या स्पर्धेतील मॅच मुंबईतील 3 मैदान, पुणे, अहमदाबाद आणि कोलकातामध्ये भरवण्यात आल्या. या सर्वच मैदानांवर अतिशय रंगतदार सामने पाहायला मिळाले. या सिझनमधील 74 सामन्यांसाठी खेळपट्टी आणि मैदान उत्तमरित्या तयार करणाऱ्या क्यूरेटर्सना बीसीआयकडून 1.25 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Asian News International (@ani_trending)

बीसीसीआय सचिव जय शाहांची मोठी घोषणा

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी स्पर्धा संपल्याच्या एक दिवसानंतर 30 मे रोजी सर्व 6 वेन्यूवरील क्यूरेटर्ससाठी हे बक्षीस जाहीर केलं आहे. शाह यांनी ट्विट करत क्यूरेटर्सना सलाम केला आणि म्हणाले की, ‘ज्या लोकांनी आम्हाला आयपीएल 2022 मध्ये सर्वात चांगल्या मॅच दिल्या, त्यांच्यासाठी सव्वा कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आमचे पडद्यामागील हिरो सर्व 6 आयपीएल व्येनूचे क्यूरेटर आणि मैदानावरील कर्मचारी’.

आयपीएल 2022 मध्ये 10 संघांमध्ये 64 दिवसांत एकूण 74 सामने खेळवण्यात आले. त्यासाठी 6 मैदानांचा वापर करण्यात आला. त्यातील तीन मुंबईत, तर पुणे, अहमदाबाद आणि कोलकाता मधील प्रत्येकी एका मैदानाचा समावेश होता. या सर्वांसाठी बक्षीस जाहीर करताना जय शाह म्हणाले की, ‘आम्ही अनेक रंगतदार सामने पाहिले, प्रत्येकाच्या मेहनतीबद्दल आम्हाला सर्वांचे आभार मानायचे आहेत. CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया – ब्रेबॉर्न स्टेडियम), वानखेडे, डीव्हीआय पाटील आणि एमसीए पुणेसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये. तर ईडन गार्डन आणि नरेंद्र मोदी स्टेडियमसाठी प्रत्येकी साडे बारा लाख रुपये’.

मुंबईत सर्वाधिक सामने

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 70 सामने हे मुंबई आणि पुण्यातील 4 मैदानांवर झाले. मुंबईत वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर सामने खेळवण्यात आले. यात सर्वाधिक 20 – 20 सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर झाले. तर ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 सामने खेळवण्यात आले. प्लेऑफचे दोन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर तर अंतिम सामन्यासह शेवटचे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.