IPL 2025 : आयपीएलमध्ये 300 धावांचा डोंगर! या खेळाडूने केली भविष्यवाणी, कोणता संघ मारणार बाजी?
300 Runs in IPL Prediction : आयपीएलमध्ये 300 धावांचा डोंगर उभारल्या जाईल, असे भाकीत या खेळाडूने वर्तवले आहे. आता कोणती टीम रण मशीन ठरणार याविषयी चर्चा होत आहे.

कोलकाता नाईट राईडर्सचा (KKR) आक्रमक आणि स्फोटक फलंदाज रिंकु सिंह याने मोठे भाकीत केले आहे. त्याच्या मते, इंडियन प्रीमियर लीग (IPL) आता अशा टप्प्यावर आले आहे की, एखादा संघ कधीही 300 धावांचा टप्पा ओलांडेल. आयपीएल 2025 आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच एखादा संघाने 300 धावांचा डोंगर उभारला तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण प्रत्येक संघ आता ‘पॉवरहिटिंग’ वर लक्ष देत आहे. मग कोणता संघ ही बाजी मारणार याविषयी रिंकू सिंहने भाकीत केले आहे.
हो, 300 धावांचा डोंगर उभा राहणार
‘जियो हॉटस्टार’ वर चर्चा करताना रिंकु सिंहने 300 धावांचा डोंगर उभा करणे शक्य आहे, असा दावा केला आहे. हा, आम्ही असे करू शकतो, असे तो म्हणाला. आयपीएल आता अशा टप्प्यावर आले आहे की, आता कोणताही संघ 300 धावा सहज काढू शकेल. गेल्या वर्षी पंजाब संघाने 262 धावांचा पाठलाग केला होता. या सत्रात सर्व टीम मजबूत स्थिती आहेत. कोणी पण 300 धावांचा टप्पा गाठू शकेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.




“मी साधारणपणे पाचव्या अथवा सहाव्या स्थानावर फलंदाजी करतो. मी उत्तर प्रदेश आणि आयपीएलमध्ये असे केले आहे, त्याची मला सवय आहे. मी फिटनेसवर जास्त लक्ष्य देतो. कारण आयपीएलमध्ये 14 सामने खेळावे लागत असल्याने शरीर तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. मी महेंद्रसिंग धोनी यांच्याशी पण मी नेहमी या विषयीवर चर्चा करतो. ते मला शांत ठेवण्याचे आणि सामन्यातील स्थितीनुसार खेळण्यास सांगतात.” असे रिंकु सिंग म्हणाला.
गेल्या वर्षी उपविजेता असलेला सनराइजर्स हैदराबादने तीनदा 250 धावांचा आकडा पार केला होता. सनराइजर्स हैदारबात या सत्रात 300 धावांचा डोंगर उभारण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. राजस्थान रॉयल्सविरोधात त्याने 7 गडी बाद होऊन 286 धावा केल्या. गेल्या वर्षी आरसीबीविरोधात या संघाने 287 धावा केल्या होत्या. त्यावेळी 3 गडी बाद झाले होते. 300 धावांचा डोंगर उभा करण्यासाठी या संघाला 14 धावांची गरज आहे.