MI vs CSK : मुंबई विरुद्ध चेन्नई मॅचआधी फॅन्ससाठी एक वाईट बातमी
MI vs CSK : IPL 2025 चा तिसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये ही मॅच होईल. या मॅचआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

IPL 2025 मध्ये आज 23 मार्चला एक मोठा सामना पहायला मिळणार आहे. संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना होणार आहे. या सामन्याला ‘एल-क्लासिको’ सुद्धा म्हटलं जातं. याचा अर्थ क्लासिक मॅच. चेन्नईच्या एमए चिदंबरम, चेपॉक स्टेडियमवर हा सामना होणार आहे. फॅन्सना मुंबई विरुद्ध सीएसके सामन्याची नेहमी प्रतिक्षा असते. या मोठ्या मॅचआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहेत. दोन्ही टीम्सनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. अशावेळी या दोन्ही टीम्स आमने-सामने येतात, तेव्हा क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा रोमांच अनुभवता येतो. पण यावेळी चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो. वेदर रिपोर्टनुसार, चेन्नईमध्ये आज 80% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चेन्नईमध्ये मेघ गर्जनेसह पाऊस कोसळू शकतो. सामन्याच्यावेळी पावसाची शक्यता 20 टक्के आहे. तापमान 27 ते 33 डिग्री राहिल असा अंदाज आहे.
पहिल्या सामन्यातही तीच भिती होती
आज पाऊस कोसळला, तर ओल्या आऊटफिल्डमुळे सामना उशिराने सुरु होऊ शकतो. तेच सामन्याच्यावेळी पाऊस झाला, तर चाहत्यांची निराशा होईल. या सीजनच्या पहिल्या सामन्यावर सुद्धा पावसाच सावट होतं. पण कोलकात्यात संपूर्ण सामन्यादरम्यान पाऊस झाला नाही. उपस्थितांनी विराट कोहलीच्या फलंदाजीचा आनंद लुटला.
चेन्नईच्या घरच्या मैदानात मुंबईचा दबदबा
चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात नेहमीच मुंबई इंडियन्सचा दबदबा राहिला आहे. दोन्ही टीम्समध्ये एमए चिदंबरम स्टेडियमवर एकूण 8 सामने झालेत. या दरम्यान मुंबईने 5 सामन्यात बाजी मारली आहे. सीएसकेची टीम 3 वेळा जिंकली आहे. त्याशिवाय आयपीएलमध्ये दोन्ही टीम्स एकूण 37 वेळा आमने-सामने आल्या आहेत. यात 20 वेळा मुंबई आणि 17 वेळा चेन्नईची टीम जिंकली आहे. म्हणजे चेन्नई विरुद्ध मुंबईची बाजू नेहमीच वरचढ ठरते. पण मागच्या काही सामन्यात चित्र बदलेलं दिसलं आहे. मागचे तीन सामने चेन्नई सुपर किंग्सने जिंकले आहे.
दोन्ही टीम्सची पॉसिबल प्लेइंग-12
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, शिवम दुबे, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, खलील अहमद, नूर अहमद आणि मथीश पथिराणा.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिंज (विकेटकीपर), मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट मुजीब उर रहमान आणि कर्ण शर्मा.