Suryakumar Yadav : सूर्याने मुंबईत ‘या’ ठिकाणी विकत घेतले दोन फ्लॅटस, किंमतीचा आकडा ऐकून विस्फारतील डोळे
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने IPL 2025 चा सीजन सुरु असताना दोन फ्लॅट्स विकत घेतले आहेत. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स टीमकडून खेळतोय. मुंबईने त्याला 16.35 कोटी रुपयात रिटेन केलय. या सीजनमध्ये सूर्याची जितकी कमाई आहे, त्यापेक्षा दीडपट जास्त किंमतीला त्याने हे फ्लॅटस विकत घेतलेत.

IPL 2025 चा सीजन सुरु असताना टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवबद्दल एक बातमी आहे. या बातमीनुसार, सूर्यकुमार यादवने मुंबईत दोन आलिशान अपार्टमेन्ट विकत घेतले आहेत. या दोन्ही फ्लॅटची किंमत IPL 2025 मधील त्याच्या कमाईपेक्षा दीडपट जास्त आहे. या दोन्ही फ्लॅटसाठी सूर्यकुमार यादवकडून 25 मार्च 2025 रोजी व्यवहार करण्यात आला.
सूर्यकुमार यादवने हे दोन्ही फ्लॅट मुंबईच्या देवनार भागात विकत घेतले आहेत. याची एकूण किंमत 21.1 कोटी रुपये आहे. IPL2025 मध्ये सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स टीमकडून खेळतोय. मुंबईने त्याला 16.35 कोटी रुपयात रिटेन केलय. या दोन्ही फ्लॅटसची किंमत विचारात घेतली, तर IPL 2025 मध्ये त्याला जितके पैसे मिळणार आहेत, त्यापेक्षा दीडपट जास्त आहे.
कुठे विकत घेतलेत फ्लॅट?
सूर्यकुमार यादवचे हे दोन्ही फ्लॅट गोदरेज स्काय टेरेस प्रोजेक्टमध्ये आहेत. टोटल कारपेट एरिया 4,222.7 चौरस मीटर आहे. सूर्याचे हे दोन्ही फ्लॅट अपार्टमेंट वेगवेगळ्या मजल्यावर आहेत. ज्या अपार्टमेंटमध्ये त्याचा फ्लॅट आहे, तिथे 6 लेयर कार पार्किंग एरिया सुद्धा आहे.
सूर्याच्या नेतृत्वात पराभवाने सुरुवात
सूर्यकुमार यादव सध्या IPL 2025 मध्ये व्यस्त आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पहिल्या सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सच नेतृत्व केलं. नियमित कॅप्टन हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी असल्याने सूर्यकुमार यादवला नेतृत्व देण्यात आलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला विजय मिळवता आला नाही. चेन्नई सुपर किंग्सकडून मुंबई इंडियन्सचा 4 विकेटने पराभव झाला.
View this post on Instagram
मुंबईचा पुढचा सामना कोणाविरुद्ध?
IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. 29 मार्चला अहमदाबादमध्ये ही मॅच होईल. या सामन्यात जी टीम जिंकेल, त्यांचं खातं उघडेल. सूर्यकुमार यादव या सामन्यात कॅप्टन म्हणून नाही, तर खेळाडू म्हणून टीमसाठी विजयाचा प्रयत्न करताना दिसेल.