LSG vs DC : मालक संजीव गोयनका मैदानात, LSG च्या पराभवानंतर पंतला ओरडा का? VIDEO
LSG vs DC : IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला एक विकेटने हरवलं. या मॅचनंतर लखनऊ फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयनका आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये मैदानावर चर्चा झाली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. क्रिकेट फॅन्स याची तुलना मागच्यावर्षी केएल राहुल सोबत झालेल्या संभाषणाशी करत आहेत.

IPL 2025 चा चौथा सामना खूपच रोमांचक ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायट्ंस यांच्यात विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला. एकवेळ लखनऊची टीम सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरीस त्यांचा एक विकेटने पराभव झाला. लखनऊने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचा टार्गेट दिलं होतं. DC ने 65 रन्सवर 5 विकेट गमावले होते. पण त्यानंतर सामना पूर्णपणे फिरला. लखनऊला आपलं टार्गेट डिफेंड करता आलं नाही. या सामन्यानंतर असं काही घडलं की, ज्याने सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर फ्रेंचायजी मालक संजीव गोयनका मैदानावर दिसले. संजीव गोयनका मागच्या सीजनच्यावेळी सुद्धा चर्चेत होते. LSG च्या पराभवानंतर मैदानातच त्यांचा कॅप्टन केएल राहुल बरोबर वाद झाला होता. यावेळी ते पंतला काहीतरी सांगताना दिसले. दोघांमध्ये काहीवेळ बोलणं झालं. टीमचे हेड कोच जस्टिन लँगर सुद्धा या चर्चेमध्ये दिसले. या चर्चेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
केएल राहुल लखनऊपासून का वेगळा झाला?
2024 आयपीएल सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता. सनरायजर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर संजीव गोयनका यांनी केएल राहुलला सुनावलं होतं. या प्रकाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यानंतर बातमी आलेली की, केएल राहुल आणि संजीव गोयनका यांच्यात सर्वकाही आलबेल नाहीय. त्यानंतर आता चालू असलेल्या सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सपासून वेगळा झाला.
आशुतोष शर्माची स्फोटक इनिंग, मॅच फिरली
लखनऊने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 209 धावा केल्या. निकोलस पूरनने सर्वाधिक 75 आणि मिचेल मार्शने 72 धावांची खेळी केली. डेविड मिलरने 27 धावांच योगदान दिलं. प्रत्युत्तरात दिल्लीच्या टीमने 6.4 ओव्हर्समध्ये 65 धावांवर 5 विकेट गमावलेले. त्यानंतर आशुतोष शर्मा एक स्फोटक इनिंग खेळला. त्याने 31 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावत दिल्लीच्या टीमला विजय मिळवून दिला.