MI vs CSK : वडिल रिक्षाचालक, पहिल्याच सामन्यात चेन्नईला दणका, मुंबई इंडियन्सने शोधलेला हा नवीन हिरा कोण?
MI vs CSK : मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध एका 24 वर्षाच्या लेफ्ट आर्म स्पिनरला IPL डेब्युची संधी दिली. पहिल्याच सामन्यात या युवा गोलंदाजाच प्रदर्शन चर्चेचा विषय ठरलं. त्याच्या घातक गोलंदाजी पाहून सगळेच हैराण झाले. कोण आहे हा गोलंदाज?

IPL 2025 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची पराभवाने सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला सहज हरवलं. प्रथम फलंदाजी करताना मुंबईला फक्त 155 धावा करता आल्या. चेन्नईने हे लक्ष्य आरामात पार केलं. पण मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यात आपली छाप उमटवली. 24 वर्षाच्या या लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनरला रोहित शर्माच्या जागी इमपॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरवण्यात आलं होतं. या टुर्नामेंटमध्ये डेब्यु करणाऱ्या या युवा बॉलरसाठी ही संधी वरदान ठरली. पहिल्यांदाच सीनियर लेव्हलवर क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूने 3 ओव्हरमध्ये 3 विकेट काढून CSK ला टेन्शनमध्ये आणलं. कोण आहे हा गोलंदाज? ज्याने आयपीएलच्या डेब्यु मॅचमध्येच लक्षवेधी प्रदर्शन केलय.
मुंबई इंडियन्सने ज्या गोलंदाजाला आयपीएलमध्ये डेब्युची संधी दिली, त्याचं नाव आहे, विग्नेश पुतुर. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण केरळचा हा खेळाडू आतापर्यंत सीनियर लेव्हलला क्रिकेट खेळला नव्हता. राज्याच्या सीनियर टीममधून त्याला अजूनपर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. इतका कमी अनुभव असतानाही चेन्नईच्या दिग्गज फलंदाजांना त्याने आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं. IPL मधील पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडला गुंडाळलं.
विग्नेशने कोणत्या विकेट काढल्या?
विग्नेशने ऋतुराज गायकवाडला ऑफ-स्टम्पच्या बाहेर फुल लेंथ बॉल टाकला. या चेंडूवर त्याने विल जॅक्सच्या हातात थेट कॅच दिली. आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने स्पिनर्स विरुद्ध षटकार ठोकणाऱ्या शिवम दुबेला कॅच आऊट केलं. दुबेने त्याच्या फ्लाइट चेंडूवर लॉन्ग-ऑनवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण तिलक वर्माला कॅच दिली. त्यानंतर दीपक हुड्डा पुतुरची तिसरी विकेट ठरला. विग्नेश पुतुरने 4 ओव्हरमध्ये 32 रन्स देऊन तीन महत्त्वाच्या विकेट काढल्या. त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे.
किती किंमतीला विकत घेतलं?
विग्नेश पुतुर केरळकडून अंडर-14 आणि अंडर-19 मध्ये खेळलाय. त्याशिवाय केरळ क्रिकेट लीगमध्ये तो एलेप्पी रिपल्सकडून खेळलाय. तिथे तीन सामन्यात त्याने दोन विकेट काढल्या होत्या. त्याशिवाय तो तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळला आहे. पण केरळ राज्याकडून अजून त्याने डेब्यु केलेला नाही. मुंबई इंडियन्स फ्रेंजायचीने या 24 वर्षाच्या खेळाडूला शोधून काढलय. त्याला 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलय. विग्नेशची निवड केल्यानंतर फ्रेंचायजीने SA 20 लीगमधील आपली टीम MI केपटाऊनसोबत ट्रेनिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला पाठवून दिलेलं.
वडिल ऑटोरिक्शा चालक
IPL डेब्यूमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या विग्नेश पुतुरसाठी हा प्रवास सोपा नव्हता. क्रिकेटर म्हणून त्याने अनेक अडचणींचा सामना केला आहे. तो एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येतो. त्याचे वडिल ऑटोरिक्शा चालक आहेत. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. क्रिकेटिंग करिअरबद्दल बोलायच झाल्यास तो सुरुवातीला लेफ्ट आर्म पेस बॉलर होता. लोकल क्रिकेटर मोहम्मद शेरिफची त्याच्यावर नजर पडली व त्याला स्पिनर बनण्याचा सल्ला दिला.
इथूनच त्याच्या करिअरला मिळाली कलाटणी
लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनरला चायनमॅन गोलंदाज म्हटलं जातं, हे विग्नेशला माहित नव्हतं. तो आपल्या गोलंदाजीवर मेहनत घेत होता. करियरमध्ये पुढे जाण्यासाठी तो मलप्पुरमवरुन त्रिशूरला गेला. तिथे तो सेंट थॉमस कॉलेजमधून केरळ कॉलेज प्रीमियर टी20 लीगमध्ये खेळला. तिथे दमदार प्रदर्शन केलं. त्यानंतर जॉली रोवर्स क्रिकेट क्लबकडून खेळला. तिथल्या चांगल्या परफॉर्मन्समुळे त्याला केसीएलमध्ये एलेप्पी रिपल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. इथूनच त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली.