AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2O22 : आंद्रे रसेलच्या खराब कामगिरीमुळे केकेआरचा पराभव, निर्णायक क्षणी शुन्यावर बाद

कोलकाताच्या डावाच्या 14 व्या षटकात आंद्रे रसेल फलंदाजीला आला. त्यावेळी कोलकाताचा अर्धा संघ केवळ 83 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अशा स्थितीत संघाला रसेलकडून मोठ्या आणि जबाबदार खेळीची अपेक्षा होती.

IPL 2O22 : आंद्रे रसेलच्या खराब कामगिरीमुळे केकेआरचा पराभव, निर्णायक क्षणी शुन्यावर बाद
आंद्रे रसेलच्या खराब कामगिरीमुळे केकेआरचा पराभव
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 10:22 AM

मुंबई – गतवर्षीचा उपविजेता कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएल 2022 मध्ये 9 पैकी 6 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. संघ प्ले ऑफमधून बाद होण्याचा धोका अधिक आहे. गुरुवारी झालेल्या स्पर्धेतील ४१ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सचा ४ गडी राखून पराभव केला. कोलकात्याच्या या पराभवाचा दोषी दुसरा कोणी नसून स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) जबाबदार आहे.

आंद्रे रसेलने बॅटमधून एकही धाव निघाली नाही

कोलकाताच्या डावाच्या 14 व्या षटकात आंद्रे रसेल फलंदाजीला आला. त्यावेळी कोलकाताचा अर्धा संघ केवळ 83 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अशा स्थितीत संघाला रसेलकडून मोठ्या आणि जबाबदार खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याने खाते न उघडता 3 चेंडूतच आपली विकेट गमावली. रसेलला कुलदीप यादवने बाद केले. कुलदीपने स्टंपवर गुगली लावली होती. ज्यावेळी रसेल पुढे जाऊन शॉट खेळायचा होता. त्यावेळी चेंडू वळला आणि तो आऊट झाला. विशेष म्हणजे ऋषभला सुध्दा तो चेंडू पकडता आला नाही, पण चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागून स्टंपला लागला आणि रसेल शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.

एका षटकात दिल्या 14 धावा

झालेल्या सामन्यात आंद्रे रसेलला फक्त एकच षटक टाकण्याची संधी मिळाली. त्यातही त्याने १४ धावा दिल्या. दिल्लीच्या डावातील 15 व्या षटकात रसेल गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी डीसीची धावसंख्या 14 षटकांत 99/5 होती. रसेलच्या षटकातील पहिल्या चेंडूवर अक्षर पटेलने मिड-विकेटवर चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. या षटकासह दिल्लीने पुन्हा एकदा सामन्यात दमदार पुनरागमन केले. 41 व्या सामन्यात दिल्लीसमोर 147 धावांचे लक्ष्य होते. दिल्ली संघाने 18 व्या षटकात 6 गडी गमावून पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नर (42) याने सर्वाधिक धावा केल्या, तर रोव्हमन पॉवेल याने 16 चेंडूत नाबाद 33 धावा करून दिल्ली विजय निश्चित केला. कोलकाताच्या खात्यात उमेश यादवने 3 बळी घेतले.

कोलकाता नाईट रायडर्सने 146 धावा केल्या

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकांत 9 गडी गमावून 146 धावा केल्या. नितीश राणाने सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी कर्णधार श्रेयस अय्यरने 42 धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवने 4 आणि मुस्तफिजुर रहमानने 3 बळी घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.