Rishabh Pant : ऋषभ पंतला 27 कोटीला विकत घेण्याचा LSG च्या मालकाला आता पश्चाताप का?

Rishabh Pant : लखनऊ सुपर जायंट्स फ्रेंचायजीने जोशमध्ये ऋषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजलेत का?. कारण मेगा ऑक्शन दरम्यान या टीमचे मालक संजीव गोयनका यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. ऋषभ पंत आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू ठरला आहे.

Rishabh Pant :  ऋषभ पंतला 27 कोटीला विकत घेण्याचा LSG च्या मालकाला आता पश्चाताप का?
Rishabh PantImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 1:30 PM

IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंतवर पैशांचा पाऊस पडला. याआधी कुठल्या खेळाडूवर इतकी विक्रमी बोली लागलेली नाही. LSG ने ऋषभ पंतवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यांनी 27 कोटी रुपये खर्च करुन ऋषभ पंतला विकत घेतलं. आयपीएलच्या इतिहासातील इतक्या महागड्या किंमतीला बोली लागल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयनका यांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप होताना दिसतोय. पंतला जास्त किंमतीला विकत घेतल्याचा त्यांना पश्चाताप आहे.

IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये संजीव गोयनका यांना ऋषभच्या खरेदीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांच्या मनातील भावना समोर आल्या. संजीव गोयनका यांनी त्यांच्या मनात जे होतं, ते बोलून दाखवलं. ऋषभ पंतला 27 कोटी थोडे जास्तच मिळाले, हे मान्य केलं.

आम्ही आधीच विचार केलेला

संजीव गोयनका यांच्यानुसार ऋषभ पंत LSG च्या प्लानचा भाग होता. त्याला विकत घेण्याचा आम्ही आधीच विचार केलेला. त्यासाठी रक्कम सुद्धा ठरवली होती. पण 27 कोटी थोडे जास्त खर्च झाले. ऋषभ पंतच LSG कडून खेळणं ही टीमच्या फॅन्ससाठी आनंदाची बाब असल्याच त्यांनी मान्य केलं. “पंत एक चांगला खेळाडू आहे, मॅच विनर आहे. त्याचा आम्हाला फायदा मिळेल” असं संजीव गोयनका म्हणाले.

ऋषभ पंतची बेस प्राइस किती होती?

IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंतने आपली बेस प्राइस 2 कोटी रुपये ठेवली होती. ऑक्शनमध्ये त्याला जास्त पैसा मिळेल असा अंदाज होता. तो सर्व रेकॉर्ड तोडणार अशी अपेक्षा होती आणि घडलं सुद्धा तसच. पंजाब किंग्स, केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण यात बाजी LSG ने मारली.

मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.