कॉमेट्री बॉक्समध्ये ईशा गुहाच्या डबल मीनिंग गुगलीवर गिलख्रिस्ट क्लीन बोल्ड

ईशाच्या प्रश्नाचा रोख गोलंदाजीच्या बोटांकडे होता. पण ती कमेंट डबल मीनिंगची ठरली. गिलख्रिस्टही आपले हसू रोखू शकला नाही. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

कॉमेट्री बॉक्समध्ये ईशा गुहाच्या डबल मीनिंग गुगलीवर गिलख्रिस्ट क्लीन बोल्ड
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 6:35 PM

सिडनी: इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू ईशा गुहाचा कॉमेंट्री बॉक्समधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ईशाने कॉमेंट्री करताना अचानक एक डबल मीनिंगचा प्रश्न विचारला. या प्रश्नाने ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर अॅडम गिलख्रिस्ट आणि दुसऱ्या एका कॉमेंट्रेटरची बोलतीच बंद झाली. बीग बॅश लीगचा सामना सुरु असताना कॉमेट्री बॉक्समध्ये हा प्रकार घडला. कॅरम बॉलवर चर्चा सुरु असताना ईशाने अचानक डबल मीनिंग प्रश्नाची गुगली टाकली.

कॅरम बॉलवर सुरु होती चर्चा

आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाजांना चकवण्यासाठी गोलंदाज कॅरम बॉलचा हुशारीने वापर करतात. खासकरुन टी-20 मध्ये हा चेंडू जास्त वापरला जातो. कॅरम बॉलवर चर्चा सुरु असताना ईशाच्या प्रतिप्रश्नाने कॉमेट्री बॉक्समधील सर्वच अवाक झाले. एक समालोचक फिरकी गोलंदाजीचे धडे देणाऱ्या अकादमीत मुख्य प्रशिक्षक गोलंदाजाचा हात पाहतात. त्यावरुन कॅरम बॉल गोलंदाजी कोण करु शकतं, ते ठरवलं जातं.

कोणालाही हसू आवरता आलं नाही

त्यावर ईशा गुहाने असा काही प्रतिप्रश्न केला की, कॉमेट्री बॉक्समधील कोणालाही हसू आवरता आले नाही. ईशाच्या प्रश्नाचा रोख गोलंदाजीच्या बोटांकडे होता. पण ती कमेंट डबल मीनिंगची ठरली. गिलख्रिस्टही आपले हसू रोखू शकला नाही. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची खेळाडू अलेक्स हार्टलीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या बीग बॅश लीग सुरु आहे. गतविजेते सिडनी सिक्सर्स, पर्थ स्कोरचर्स आणि मेलबर्न स्टार्स यांनी जोरदार सुरुवात केली आहे. सिडनी सिक्सर्सने आतापर्यंत तीन वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे.

संबंधित बातम्या: Virat kohli press confrence: ‘रोहित आणि माझ्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही, हे वारंवार सांगून आता मी थकलोय’ Virat kohli on odi series: ‘खोट्या बातम्या लिहितात त्यांना विचारा’, पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे Virat kohli on odi series: ‘मी वनडे सीरीजसाठी उपलब्ध, रोहितची उणीव जाणवेल’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.