Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहच्या दुखापती संदर्भात महत्त्वाची अपडेट, कोणाचा पत्ता कट होऊ शकतो?
Jasprit Bumrah : टीम इंडिया पुढच्या दोन दिवसात तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. या कसोटीआधी टीम इंडियात काही बदल होऊ शकतात. टीममधून कोणाचा पत्ता कट होऊन, कोणाला संधी मिळू शकते? आता जसप्रीत बुमराहच्या दुखापती संदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे.
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही टीम्समध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीज सुरु आहे. आतापर्यंत दोन कसोटी सामने झाले असून मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचने पर्थ कसोटी जिंकली, तर ऑस्ट्रेलियाने अॅडलेडवर विजय मिळवला. आता तिसऱ्या कसोटी सामन्याआधी जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्याला दुखात झाल्याची चर्चा आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराहने केलेल्या गोलंदाजीवरुन त्याच्या फिटनेसबद्दल शंका निर्माण झालीय. बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार का? असा प्रश्न विचारला जातोय. तिसरा कसोटी सामना गाबा येथे होणार आहे.
आता एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना फिट वाटतोय. जसप्रीत बुमराहने नेट्समध्ये सराव केला. त्याने केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालला गोलंदाजी केली. सुरुवातीला त्याने थोडी लेग ब्रेक गोलंदाजी केली. त्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे फास्ट बॉलिंग केली. बुमराहच्या फिटनेसशिवाय केएल राहुल सलामीला येणार हे सुद्धा संकेत मिळत आहेत.
तिसऱ्या कसोटीत कोणाला संधी मिळू शकते?
गाबा टेस्ट मॅच 14 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या कसोटीसाठी टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करु शकते. फलंदाजाच्या क्रमवारीत फार बदल होणार नाहीत. वॉशिंग्टन सुंदर सुद्धा कमबॅक करु शकतो. मोहम्मद सिराजने विकेट काढले. पण त्याने बऱ्याच धावा दिल्या. सिराजच्या जागी आकाश दीप किंवा प्रसिद्ध क्रिष्णासाठी टीमचे दरवाजे उघडले जाऊ शकतात.
Jasprit Bumrah started off with a couple of leg-breaks alongside R Ashwin but he’s now running in hot & bowling at full tilt, being an absolute handful to KL Rahul & Yashasvi Jaiswal #AusvInd pic.twitter.com/3IRzE0QXbm
— Bharat Sundaresan (@beastieboy07) December 12, 2024
प्राधान्य कोणाला मिळणार?
अशी सुद्धा चर्चा आहे की, एका पॉइंटला टीम मॅनेजमेंट रवींद्र जाडेजाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करु शकते. गाबाची खेळपट्टी विचारात घेता ही विकेट वेगवान गोलंदाजीला अनुकूल आहे. इथे चेंडूला उसळी मिळेल. वेगवान गोलंदाजांना प्राधान्य मिळू शकतं. दुसऱ्या कसोटीत हर्षित राणा अपयशी ठरला. त्यामुळे आकाश दीप आणि प्रसिद्ध क्रिष्णासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पर्थ कसोटीत टीम इंडियाने खासकरुन जसप्रीत बुमराहने लाजवाब प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे त्याचं फिट रहाणं टीम इंडियासाठी खूप महत्त्वाच आहे.