IND vs AUS : टेन्शन वाढलं, हुकूमी एक्का मैदानाबाहेर, जसप्रीत बुमराहने अचानक का सोडलं मैदान? VIDEO
IND vs AUS : सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या दरम्यान एक मोठी बातमी आहे. जसप्रीत बुमराहने अचानक मैदान सोडलय. भारतीय गोलंदाज या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करतायत.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मधला शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर सुरु आहे. या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कॅप्टन आहे. या सीरीजमध्ये जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आज सामन्याच्या दुसऱ्यादिवशी जसप्रीत बुमराहने अचानक मैदान सोडलं. जसप्रीत बुमराहने दुसऱ्यादिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये कमालीची गोलंदाजी केली. त्याला एक विकेट मिळाला. पण लंच नंतर असं काही झालं की, भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या ह्दयाचे ठोके वाढले आहेत.
जसप्रीत बुमराह लंच नंतर मैदानात दिसला नाही. तो सपोर्ट स्टाफसोबत मैदानाबाहेर जाताना दिसला. त्यावेळी तो टीम इंडियाच्या जर्सीत नव्हता. त्याने ट्रेनिंग किट घातलं होतं. जसप्रीत बुमराहला काहीतरी समस्या आल्याची चर्चा आहे. ग्राऊंड बाहेर एका कारमध्ये तो दिसला. जसप्रीत बुमराहला काहीतरी दुखापत झालीय. त्याला टीम स्टाफसोबत स्कॅनसाठी पाठवण्यात आलय. तो कोहलीसोबत बोलला व मैदान सोडलं. त्यानंतर टीमचे सुरक्षा संपर्क अधिकारी अंशुमान उपाध्याय आणि टीमच्या डॉक्टरांसोबत तो मैदानाबाहेर जाताना दिसला.
जसप्रीत बुमराहने या सीरीजमध्ये किती विकेट काढलेत?
जसप्रीत बुमराहने या सीरीजमध्ये आतापर्यंत 32 विकेट काढले आहेत. अशावेळी जसप्रीत बुमराहच मैदानाबाहेर जाणं टीम इंडियासाठी एक झटका आहे. सिडनी कसोटीत बुमराहने आतापर्यंत 10 ओव्हर गोलंदाजी करुन 2 विकेट काढलेत. या सामन्यात तो दमदार गोलंदाजी करतोय. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहली टीमच नेतृत्व करतोय.
भारतीय चाहत्यांची एकच इच्छा
जसप्रीत बुमराह किमान वर्षभर पाठिच्या दुखण्यामुळे मैदानापासून लांब होता. न्यूजीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये त्याचं पाठिच ऑपरेशन झालं. जून 2022 मध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यावेळी दुखापतीमुळे तो 2022 चा T20 वर्ल्ड कप सुद्धा खेळू शकला नव्हता. आता भारतीय चाहत्यांची एकच इच्छा आहे, जसप्रीत बुमराहची दुखापत गंभीर नसावी.
Jasprit Bumrah has left the SCG: https://t.co/0nmjl6Qp2a pic.twitter.com/oQaygWRMyc
— cricket.com.au (@cricketcomau) January 4, 2025
भारताची दमदार गोलंदाजी
सिडनी कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. भारताला पहिल्या डावात 4 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 3 तर नितीश रेड्डी आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतले.