Australia New Captain : भारताविरुद्धच्या सीरीजआधी ऑस्ट्रेलियाकडून वनडे आणि T20 साठी नव्या कॅप्टनची घोषणा

Australia New Captain : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये येत्या 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर सीरीज सुरु होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी वनडे आणि T20 साठी नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे. हा वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा 30 वा तर T20 मध्ये 14 वा कर्णधार असणार आहे.

Australia New Captain : भारताविरुद्धच्या सीरीजआधी ऑस्ट्रेलियाकडून वनडे आणि T20 साठी नव्या कॅप्टनची घोषणा
Australian TeamImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 12:04 PM

वनडे आणि T20 साठी ऑस्ट्रेलियाने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. जॉश इंग्लिस आता व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा नवा कॅप्टन असेल. वनडेमध्ये जॉश इंग्लिस पॅट कमिन्सकडून तर T20 इंटरनॅशनलमध्ये मिचेल मार्शची जागा घेणार आहे. जॉश इंग्लिस ऑस्ट्रेलियाचा वनडेमध्ये 30 वा तर T20 मध्ये 14 वा कर्णधार असणार आहे. जॉश इंग्लिस पाकिस्तान विरुद्धच्या वनडे आणि T20 सीरीजपासून आपली नवीन जबाबदारी संभाळेल.

जॉश इंग्लिसच्या कॅप्टनशिपबद्दल एक गोष्ट स्पष्ट आहे, त्याला फक्त पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी कॅप्टन बनवण्यात आलं आहे. यामागे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कारण आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीज सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा वनडेमधील नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि T20 कॅप्टन मिचेल मार्श या सीरीजच्या तयारीमध्ये व्यस्त असतील. ते पाकिस्तान विरुद्धची सीरीज खेळणार नाहीत.

कुठले ऑस्ट्रेलियन खेळाडू वनडे सीरीजमधून बाहेर पडणार?

पाकिस्तान विरुद्ध सीरीजमध्ये जॉश इंग्लिस तिसऱ्या वनडेपासून ऑस्ट्रेलियन टीमच नेतृत्व करेल. दोन्ही देशांमध्ये तिसरा वनडे सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांची T20 सीरीज आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत ही सीरीज चालेल. पॅट कमिन्स पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या वनडेपर्यंत कॅप्टनशिप करताना दिसेल. त्यानंतर कमिन्ससोबत मिचेल स्टार्क जॉश हेजलवुड आणि स्टीव स्मिथ हे सर्व खेळाडू वनडे सीरीजमधून बाहेर होतील. भारताविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी सुरु करतील.

असं झाल्यास नव्या कॅप्टनसाठी चॅलेंजिग सुरुवात

ऑस्ट्रेलियाने मेलबर्न येथे पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानला 2 विकेट्सने हरवलं. वनडे सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरा वनडे सामना एडिलेडमध्ये होणार आहे. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियन टीम सीरीज जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या वनडेत पाकिस्तानने पलटवार केल्यास नवीन कॅप्टन जॉश इंग्लिससाठी नव्या करियरची चॅलेजिंग सुरुवात असेल.

Non Stop LIVE Update
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.
'...असं गाव दाखवा अन् 1 लाख मिळवा', तानाजी सावंतांचं मतदारांना चॅलेंज
'...असं गाव दाखवा अन् 1 लाख मिळवा', तानाजी सावंतांचं मतदारांना चॅलेंज.
शिंदेंच्या निवडणुकीपूर्वी10 घोषणा, लाडक्या बहिणींना 1500 च्या ऐवजी...
शिंदेंच्या निवडणुकीपूर्वी10 घोषणा, लाडक्या बहिणींना 1500 च्या ऐवजी....
बारामतीचं नेतृत्व बदला, बारामतीकरांना आवाहन; पवार दादांविरोधात मैदानात
बारामतीचं नेतृत्व बदला, बारामतीकरांना आवाहन; पवार दादांविरोधात मैदानात.
प्रचाराचा पहिला गेअर पडला, 'लाडकी बहीण'वरून ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली
प्रचाराचा पहिला गेअर पडला, 'लाडकी बहीण'वरून ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली.
शिंदे-राज यांच्यातील संबंधात तणाव,अमित ठाकरेंविरोधातील उमेदवारीन खटके?
शिंदे-राज यांच्यातील संबंधात तणाव,अमित ठाकरेंविरोधातील उमेदवारीन खटके?.
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.