Prithvi Shaw : पृथ्वी शॉ ची आज अशी हालत का? उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचा मोठा खुलासा

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ साठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले गेले. पृथ्वीने तिथेही छाप उमटवली. पण त्यानंतर पृथ्वी शॉ च करिअर उतरणीला लागलं. पृथ्वी या शर्यतीत असा मागे पडला की, नुकतच सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये आयपीएल मेगा ऑक्शन पार पडलं. त्यात पृथ्वी शॉ ला एकही खरेदीदार मिळाला नाही.

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ ची आज अशी हालत का? उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचा मोठा खुलासा
prithvi shaw mcaImage Credit source: Mca Facebook
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 10:10 AM

क्रिकेटमुळे पृथ्वी शॉ ला नाव मिळालं, ओळख मिळाली. पण तोच पृथ्वी शॉ आज क्रिकेट व्यतिरिक्त अन्य कारणांसाठी चर्चेत असतो. मुंबईत शालेय स्तरावर क्रिकेट खेळताना पृथ्वी शॉ ने दमदार प्रदर्शन केलं. त्याने आपल्या प्रदर्शनाने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. टीम इंडियाच भविष्य म्हणून पृथ्वी शॉ कडे पाहिलं जात होतं. 2018 साली पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर पृथ्वी शॉ साठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले गेले. पृथ्वीने तिथेही छाप उमटवली. पण त्यानंतर पृथ्वी शॉ च करिअर उतरणीला लागलं. पृथ्वी या शर्यतीत असा मागे पडला की, नुकतच सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये आयपीएल मेगा ऑक्शन पार पडलं. त्यात पृथ्वी शॉ ला एकही खरेदीदार मिळाला नाही. पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला. याच पृथ्वी शॉ ने टेस्टमध्ये टीम इंडियाकडून डेब्यु करताना शतक झळकावलं होतं.

पृथ्वी शॉ आज मागे पडला, त्यावरुन त्याच्या लाईफस्टाइलबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. करिअरला योग्य दिशा नाहीय. पृथ्वीच्या या स्थितीबद्दल बोलताना कलिनाचे आमदार संजय पोतनीस म्हणाले की, पृथ्वीच्या आसपास चांगली माणसं नाहीयत. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात संजय पोतनीस यांनी पृथ्वी शॉ ला भरपूर मदत केली. संजय पोतनीस हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत. नुकतीच त्यांनी कलिना विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली.

आमदार संजय पोतनीस पृथ्वी शॉ बद्दल काय म्हणाले?

“आज पृथ्वी शॉ च्या जवळ जी माणसं आहेत, ती त्याला राईडला घेऊन जातात. पण कमबॅक करण्यासाठी क्रिकेटरला काय मेहनतीची आवश्यकता आहे, त्याची त्यांना कल्पना नाही” असं पोतनीस यांनी सांगितलं. “पृथ्वीचा खेळ वाईट नाहीय. पण त्याच्या आसपास वेगळ्या पद्धतीची माणसं आहेत. कोणाला त्याच्या खेळाची काळजी नाहीय. सगळे त्याचा फायदा उचलतायत. त्याच्यासोबत कोणी नाहीय. तो स्वत:वर अवलंबून आहे. सांताक्रूझवरुन तो जुहू, बँड्राला गेला, त्याची काळजी घेणारं कोणी नाहीय” असं संजय पोतनीस इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले.

त्यांनी पृथ्वी शॉ ला फ्लॅट घेऊन दिला

पृथ्वी शॉ चा विरारवरुन येण्याचा प्रवासाचा वेळ वाचावा, त्याला खेळाकडे जास्त लक्ष देता यावं, म्हणून संजय पोतनीस यांनी शॉ कुटुंबाला सांताक्रूझमध्ये राहण्यासाठी फ्लॅट उपलब्ध करुन दिला. सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. पृथ्वी शॉ मुंबई टीमसाठी ओपन करतोय. आतापर्यंत सहा सामन्यात दोनवेळा तो शुन्यावर आऊट झालाय. सहा सामन्यात त्याने 130 रन्स केले आहेत. त्यात नागालँड विरुद्ध सर्वाधिक 40 धावा आहेत.

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....