विराट भावा, कडकनाथ खा, थेट BCCI ला पत्र
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला आपलं आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी थेट मध्य प्रदेशातील झाबुआ कृषी विज्ञान केंद्रानेच सल्ला दिला आहे. हा सल्ला सुद्धा नुसता बोलून दाखवला नाही, तर थेट भारतीय क्रिकेटचं मुख्य प्रशासन असलेल्या बीसीसीआयलाच पत्र लिहून कळवला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि इतर खेळाडू ग्रिल्ड […]
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला आपलं आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी थेट मध्य प्रदेशातील झाबुआ कृषी विज्ञान केंद्रानेच सल्ला दिला आहे. हा सल्ला सुद्धा नुसता बोलून दाखवला नाही, तर थेट भारतीय क्रिकेटचं मुख्य प्रशासन असलेल्या बीसीसीआयलाच पत्र लिहून कळवला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि इतर खेळाडू ग्रिल्ड चिकन खातात असे कळले असून, त्यांनी ते खाणं थांबवून कडकनाथ कोंबडी खावी, असा सल्ला या पत्रातून कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.
क्रीडा क्षेत्रातले अनेक जण फिटनेसबाबत जागरुक असतात. त्यामुळे काही जण चिकन खात नाहीत. त्यात फॅटचं प्रमाण अधिक असतं. मात्र कडकनाथ कोंबडा पौष्टिक असून त्यात फॅट देखील जास्त नसतं. त्यामुळे टीम इंडियाच्या डाएट प्लॅनमध्ये याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी झाबुआ कृषी विज्ञान केंद्राने केली आहे.
कोलेस्ट्रोल आणि फॅट्सच प्रमाण कडकनाथ कोंबड्यामध्ये कमी असतं. तसेच, लोह आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असतं.
कडकनाथ कोंबडीचं मूळ वाण हे मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातले असून, या कडकनाथ कोंबडीला जगभरातून मागणी असते. साधारणपणे नराचं वजन दीड ते दोन किलो असतं, तर मादीचं वजन साधारण सव्वा किलो भरतं. रंगाने काळसर असलेलं कडकनाथ कोंबडीचं चिकन, सर्वसाधारण कोंबड्यांच्या चिकनपेक्षा सुमारे तीनपट महाग आहे.
कडकनाथ कोंबडी खाण्याचे फायदे :
- कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो
- दमा, अस्थमा, टीबी आजारावरही गुणकारी
- प्रथिने आणि लोहं प्रमाण 25-70टक्के
- कडकनाथ कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्यने हृदयविकार टाळता येतो
- शरीरातील फॅटचं प्रमाण कमी होतं
Krishi Vigyan Kendra, Jhabua (Madhya Pradesh) writes to BCCI and Indian captain Virat Kohli asking them to now consider eating ‘Kadaknath’ chicken due to its low cholesterol and fat content. pic.twitter.com/DH4GVNDGC5
— ANI (@ANI) January 2, 2019