KXIP vs CSK ​: वॉटसन आणि डू प्लेसिसने रचली IPL इतिहासातील सर्वात मोठी पार्टनरशीप

चेन्नई सुपर किंग्जसने काल (रविवारी) रात्री झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा 10 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे.

KXIP vs CSK ​: वॉटसन आणि डू प्लेसिसने रचली IPL इतिहासातील सर्वात मोठी पार्टनरशीप
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 8:36 AM

दुबई : महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) काल (रविवारी) रात्री झालेल्या सामन्यात के. एल. राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab) 10 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. पंजाबने विजयासाठी दिलेल्या 179 धावांचे आव्हान चेन्नईने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. शेन वॉटसन (Shane Watson) आणि फॅफ डु प्लेसिस (Faf du Plessis) या सलामीच्या जोडीने चेन्नईला विजय मिळवून दिला. या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अवघ्या 106 चेंडूत नाबाद 181 धावांची धमाकेदार सलामी भागीदारी केली. (Shane Watson and Faf Du Plessis recorded highest first wicket partnership in IPL History)

शेन वॉटसनने 53 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर दुसऱ्या बाजूला फॅफ डु प्लेसिसनेही नाबाद 87 धावा केल्या. त्याने या खेळीत 11 चौकार आणि षटकार लगावला. पंजाबच्या एकाही गोलंदाजाला चेन्नईची एकही विकेट मिळवता आली नाही. यादरम्यान या दोन फलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी रचली.

यापूर्वी चेन्नईच्याच मुरली विजय आणि माईक हस्सी या दोघांनी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध 28 मे 2011 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी 159 धावांची भागीदार केली होती.

आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय चेन्नईच्या संघाने लागोपाठी तीन सामने गमावले होते. त्यानंतर कालच्या सामन्यात चेन्नईने पराभवांची मालिका खंडित केली. यावेळी चेन्नईने 10 विकेट आणि 14 चेंडू राखून सामना एकहाती जिंकला. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

दरम्यान आयपीएलमध्ये आतापर्यंत 12 वेळा एखाद्या संघांने दुसऱ्या संघाला 10 विकेट राखून पराभूत केले आहे. चेन्नईच्या संघाने याआधी 10 एप्रिल 2013 रोजी झालेल्या सामन्यात पंजाबवर 10 विकेट राखून विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या

वय हे काहींसाठी संघाबाहेर काढण्यासाठीचं कारण, इरफान पठाणचा धोनीवर अप्रत्यक्ष हल्ला

MS Dhoni IPL 2020 | मॅच फिनिशर धोनीचा फॉर्म हरवला?, चाहत्यांना हुरहुर

(Shane Watson and Faf Du Plessis recorded highest first wicket partnership in IPL History)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.