Milkha Singh: ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन, कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी

भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Milkha Singh: ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन, कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी
मिल्खा सिंग
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 1:22 AM

नवी दिल्ली: भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 20 मे  2021 रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला होता. चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात मिल्खासिंग यांनी शुक्रवारी रात्री (18 जून) अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. (Legendary Indian Sprinter Flying Sikh Milkha Singh Passed Away due to Corona at the age 91)

गुरुवारी कोरोना निगेटिव्ह

मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 मे रोजी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मिल्खा सिंग यांच्या शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना पीजीआयएमआर नेहरु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुःख व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत. त्यांनी देशाच्या असंख्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं  हे फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये मिल्खा सिंह यांच्याशी गेल्या काही दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं. ती चर्चा अखेरची असेल असं वाटलं नव्हतं, असं देखील मोदी म्हणाले.

मिल्खासिंग यांच्या जीवनावर चित्रपट मिल्खा सिंह यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ या नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. मात्र,चित्रपटात मिल्खा सिंह यांच्या जीवनातील थोडासाच संघर्ष दाखवण्यात आला होता. फ्लाईंग सिख या नावाने देखील ते प्रसिद्ध होते. मिल्खा सिंह यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता. मिल्खा सिंह यांनी 1968 कॉमनवेल्थ गेम्समध्ये विजेतेपद  मिळवलं होतं.  1960 च्या ऑलम्पिक स्पर्धेत ते चैौथ्या स्थानावर राहिले होते भाग घेतला होता.

संबंधित बातम्या:

भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांच्या पत्नी कालवश, कोरोना संक्रमनामुळे निधन

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात BCCI मैदानात, 2000 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा

(Legendary Indian Sprinter Flying Sikh Milkha Singh Passed Away due to Corona at the age 91)

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.