Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकमध्ये पुन्हा गदारोळ! महिला बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरला पुरुष

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अल्जीरियाची बॉक्सर इमान खेलीफवर पुरुष असल्याचे आरोप झाले. आता तिच्यासारखीच एक महिला खेळाडू वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही खेळाडू मागच्यावर्षी जेंडर टेस्टमध्ये फेल झाली होती.

Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकमध्ये पुन्हा गदारोळ! महिला बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरला पुरुष
olympic boxer who failed gender eligibility testImage Credit source: Richard Pelham/Getty Images
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 11:59 AM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला बॉक्सिंगवरुन बरेच वाद होत आहेत. नुकतीच महिलांच्या वेल्टरवेट गटात प्री-क्वार्टर फायनलमध्ये इटलीची बॉक्सर एंजेला कारिनी आणि अल्जीरियाची बॉक्सर इमान खेलीफ यांच्यात सामना झालेला. या लढतीत अल्जीरियाची बॉक्सर इमान खेलीफवर पुरुष असल्याचे आरोप झाले होते. आता असच आणखी एक प्रकरण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समोर आलय. मागच्यावर्षी एका महिला खेळाडूची लिंग ओळख चाचणी झाली होती. या खेळाडूला IBA वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी अयोग्य ठरवण्यात आलं होतं.

अल्जीरियाची बॉक्सर इमान खलीफा नंतर आता तैवानची लिन यू-टिंगच्या जेंडरवरुन वाद निर्माण झालाय. लिन यू-टिंगने उज्बेकिस्तानच्या सिटोरा टर्डीबेकोवाला तीन राऊंडमध्ये पराभूत करुन क्वाटर फायनलमध्ये प्रवेश केला होता. लिन यू-टिंग सुद्धा मागच्यावर्षी जेंडर टेस्टमध्ये फेल झाली होती. पण इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने तिला ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळण्याची परवानगी दिली.

जेंडर टेस्टवरुन अनेक प्रश्न

या सामन्यानंतर उज्बेकिस्तानच्या सिटोरा टर्डीबेकोवाने लिनशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. एक पुरुषाची क्षमता असलेली बॉक्सर लिनच्या सहभागाविरोधात हे पाऊल उचलल्याच तिने सांगितलं. 28 वर्षाच्या लिन यू-टिंगच हे दुसरं ऑलिम्पिक आहे. याआधी ती टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा सहभागी झाली होती. दोन वेळ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. मागच्या वर्षीपासून जेंडर टेस्टवरुन तिच्यावर अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

ऑलिम्पिकमध्ये कसा मिळवला प्रवेश?

लिन यू-टिंगने 2008 साली ताइपेच्या मिडिल स्कूलमध्ये बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर 2017 मध्ये वियतनाममध्ये आयोजित एशियाई चॅपियनशिप शौकिया चॅपियनशिप स्तरापासून सुरुवात केली. 2019 एशियाई चॅपियनशिप, 2022 आशियाई खेळ आणि 2022 वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. एशियाई खेळातील विजयाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिचा प्रवेश निश्चित झाला.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.