VIDEO : लाजिरवाण्या पराभवानंतर केएल राहुलला झापलं, संजीव गोयंकानी सर्वांसमोर फटकारलं ?
लखनऊ सुपरजायंट्सचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 10 विकेट्सने लाजिरवाणा पराभव झाला. मोठी गोष्ट म्हणजे हैदराबादने 166 धावांचे लक्ष्य अवघ्या 9.4 षटकांत पार केले. लखनौच्या या दणदणीत पराभवानंतर केएल राहुलला संघाचे मालक संजीव गोयंका यांनी फटकारल्याचे वृत्त आहे.
आयपीएल 2024 चा फीव्हर सध्या सर्वांनाच चढला आहे. या सीझनच्या 57 व्या मॅचची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे, त्याचं कारण म्हणजे लखनऊ सुपरजायंट्सचा झालेला पराभव. सनरायझर्स हैदराबादच्या टीमने लखनऊ संघाचा 10 विकेट्सनी पराभव करत शानदार विजय साजरा केला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना 165 धावा केल्या. आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने अवघ्या 9.4 षटकांत हे लक्ष्य गाठले. लखनऊ संघाचा हा पराभव अतिशय लाजिरवाणा असून आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा संघ इतक्या वाईट पद्धतीने पराभूत झाला असेल.
या पराभवामुळे लखनऊ संघाचे चाहते दु:खात आहे, मात्र या सामन्यानंतर कर्णधार के. एल. राहुल याला जे सहन करावं लागलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. हा सामना संपल्यानंतर केएल राहुल हा लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांच्याशी बोलताना दिसला. मात्र त्यांच्यात चर्चा कमी वाद होतानाच दिसला. संजीव गोयंका यांनी राहुल याला चांगलंच फटकारलं, असा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओही सध्या व्हायरल झालाय.
के.एल. राहुलला सर्वांसमोर झापलं ?
सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका हे एकमेकांशी बोलताना दिसले. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. पण या चर्चेचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामधील गोयंका यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं दिसतं ते लखनऊच्या परफॉर्मन्समुळे रागावले होते आणि केएल राहुल याला बरंच काही सुनावलं. तर दुसरीकडे राहुल हा त्यांना काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होता. राहुल याला त्याचा बॉस, अर्थात संजीव गोयंका फटकारत होते, असा दावा आता या व्हिडीओनंतर केला जात आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही.
This is just pathetic from @LucknowIPL owner Never saw SRH management with players on the field or even closer to dressing room irrespective of so many bad seasons and still face lot of wrath for getting involved. Just look at this @klrahul leave this shit next year #SRHvsLSG pic.twitter.com/6NlAvHMCjJ
— SRI (@srikant5333) May 8, 2024
राहुलच्या चुकीचा बसला फटका
खरंतर लखनऊ सुपरजायंट्सच्या पराभवाची मोठी जबाबदारी केएल राहुलची आहे कारण या सामन्यात कर्णधारानेच अनेक चुका केल्या. विशेष म्हणजे फलंदाजीत तो पूर्णपणे अपयशी ठरला. या सामन्यात राहुलने 33 चेंडूत 29 धावा केल्या, त्याचा स्ट्राईक रेट 87.88 होता. राहुलच्या संथ फलंदाजीमुळे पॉवरप्लेमध्ये लखनऊच्या संघाला केवळ 27 धावा करता आल्या, त्याच खेळपट्टीवर हैदराबाद संघाने पॉवरप्लेमध्ये 107 धावा केल्या. या सामन्यात राहुलने अतिशय बचावात्मक खेळ केल्यामुळे त्याच्या संघाचं मोठं नुकसान झालं. यानंतर कर्णधारपदाच्या आघाडीवरही राहुल अपयशी ठरला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांची खेळी रोखण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीच योजना नव्हती, परिणामी हैदराबादच्या टीमने 9.4 षटकांत सामना जिंकला आणि लखनऊच्या संघाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.