एक असा खेळाडू ज्याला धोनीनं बसवून ठेवलं, नंतर त्यानं संधी मिळताच सोनं केलं, एका खेळाडूची प्रेरणादायी बातमी

पुणे वॉरीयर्सकडून संधी 2011 साली इम्तियाजला IPL मध्ये खेळण्याची संधी मिळाली. | imtiaz ahmed

एक असा खेळाडू ज्याला धोनीनं बसवून ठेवलं, नंतर त्यानं संधी मिळताच सोनं केलं, एका खेळाडूची प्रेरणादायी बातमी
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 10:51 PM

मुंबई: धोनीची ओळख आहे ती हिऱ्यांची पारख करण्यात. म्हणजे त्याच्या कारकिर्दीत चांगल्या चांगल्या खेळाडूंची कारकिर्द बहरली. पण  त्याच्याकडूनही काही वेळेस चूक झाल्याचं दिसतं. उदाहरण आहे उत्तर प्रदेशचा 35 वर्षीय मध्यमगती गोलंदाज इम्तियाज अहमद. (Here’s everything you need to know about the Indian pacer Imtiaz Ahmed who knocked Chris Gayle in Abu Dhabi T10 League)

पुणे वॉरीयर्सकडून संधी 2011 साली इम्तियाजला IPL मध्ये खेळण्याची संधी मिळाली. पुणे वॉरीयर्सनं त्याला विकत घेतलं होतं. नंतर 2013 मध्ये इम्तियाजनं रणजी ट्रॉफित धमाकेदार प्रदर्शन केलं. त्याचाच परिणाम म्हणून इम्तियाजला धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं विकत घेतलं. रणजीत इम्तियाजनं 9 सामन्यांमध्ये 37 विकेट घेतल्या. त्या मोसमात सर्वाधिक विकेटचा मान इम्तियाजकडेच होता. एवढं चांगलं प्रदर्शन करुनही धोनीनं मात्र इम्तियाजला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं नाही. चेन्नईकडून तो बेंचवर बसून राहीला.

इम्तियाजनं आतली आग विझू दिली नाही पण चांगल्या खेळाडूच्या आतली आग कशानेच संपत नाही. इम्तियाज अहमदचेही तसच झालेलं दिसतंय. अबुधाबीत सुरु असलेल्या T10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सनं इम्तियाजला खेळण्याची संधी दिली. प्लेईंग इलेव्हनमध्ये घेतलं. त्याचं त्यानं सोनं केलं. ख्रिस गेलसारख्या तिसमार खान समोर असतानाही इम्तियाज जराही डळमळीत झाला नाही.

गेलची जेव्हा दांडी उडवली इम्तियाजनं डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून पहिली ओव्हर टाकली आणि त्याच ओव्हरमध्ये विजय निश्चित केला. पहिल्या बॉलवर ख्रिस गेलनं चौका ठोकला. पण तिसऱ्याच बॉलवर गेलला इम्तियाजनं त्याला आऊट केलं. त्यानंतर त्याच्या जागी आला पॉल स्टर्लिंग. त्यानं इम्तियाजच्या चौथ्या बॉलवर चौका मारला. पण इम्तियाजनं टाकलेल्या पाचव्या बॉलचं उत्तर पॉलकडं नव्हतं. पॉल माघारी परतला. विशेष म्हणजे इम्तियाजनं एका ओव्हरमध्ये दोन मोठ्या विकेट घेत फक्त आठ रन्स दिल्या.

संबंधित बातम्या :

Tim Paine | भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव, आता ऑस्ट्रेलियाच्या टीम पेनचं कर्णधारपदच धोक्यात!

पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगरला उपरती, म्हणतात ‘आता भारताला कधीच कमी समजणार नाही!’

Australia Tour South Africa 2021 | भारताविरुद्धच्या कामगिरीचा फटका, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडला बाहेरचा रस्ता

(Here’s everything you need to know about the Indian pacer Imtiaz Ahmed who knocked Chris Gayle in Abu Dhabi T10 League)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.