Maharashtra Football Cup : सिंधुदुर्गातील ‘या’ शाळेने मारली बाजी, अटीतटीच्या सामन्यात विजय
प्रत्येक जिल्ह्यातून एक विजेता संघ निवडला जाणार आहे. विजेत्या टीमची दुसऱ्या जिल्ह्याच्या टीम बरोबर मॅच होईल. हा या स्पर्धेचा दुसरा टप्पा असणार आहे. जिल्हा तसेच विभाग पातळीवर एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धा सुरु आहेत.
सिंधुदुर्ग : सध्या राज्यात एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेची धूम आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात जिल्हा स्तरावर या स्पर्धा सुरु आहेत. महाराष्ट्राच्या मातीतून उत्तम फुटबॉलपटू घडवणं हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एक विजेता संघ निवडला जाणार आहे. विजेत्या टीमची दुसऱ्या जिल्ह्याच्या टीम बरोबर मॅच होईल. हा या स्पर्धेचा दुसरा टप्पा असणार आहे. जिल्हा तसेच विभाग पातळीवर एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धा सुरु आहेत. नुकतीच सिंधुदुर्गात ही स्पर्धा पार पडली. एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेत अंडर 14 गटातील फुटबॉलपटू सहभागी होत आहेत.
फुटबॉल वेगाबरोबर तंत्राचा खेळ
भारतात क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. पण फुटबॉलची क्रेझ सुद्धा कमी नाहीय. दिवसेंदिवस भारतात फुटबॉल चाहत्यांची संख्या वाढतेय. यात शालेय स्तरावरील मुलांच प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक शाळांमध्ये फुटबॉल मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. त्यामुळे लहान वयापासूनच मुलांना फुटबॉलची गोडी लागलीय. अनेक मुलांना परदेशातील लोकप्रिय फुटबॉलपटूंची नावं तोंडपाठ असतात. फुटबॉल वेगाबरोबर तंत्राचा खेळ आहे. फुटबॉलच तंत्र व्यवस्थित घोटवलं तर, चांगल्या दर्जाचे उत्तम फुटबॉलपटू तयार होऊ शकतात. म्हणूनच एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेच आयोजन करण्यात आलय. सिंधुदुर्गातील ‘या’ शाळेने मिळवलं विजेतेपद
सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेल्या एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धेच्या उद्घाटनाला विद्यामंदिर माणगावचे अध्यक्ष मुख्याध्यापक तालुका क्रीडा अधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत सैनिक स्कूल आंबोली शाळेने अंतिम विजेतेपद मिळवलं. सेंट झेवियर आजगाव स्कूलने उपविजेतेपद मिळवलं. सैनिक स्कूलने 1-0 च्या फरकाने सामना जिंकला. बक्षीस वितरणास कुडाळ तालुका तहसीलदार अमोल पाठक उपस्थित होते.
फुटबॉलपटूंना जर्मनीला पाठवणार
या स्पर्धेत सर्वोत्तम खेळ दाखवणाऱ्या 20 फुटबॉलपटूंना जर्मनीला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. बार्यन म्युनिच क्लबमध्ये महाराष्ट्रातील या खेळाडूंना ट्रेनिंग देण्यात येईल.